🕒 1 min read
दिल्ली : आयपीएलमध्ये गुरुवारी झालेल्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्स संघावर ७ गडी राखुन दणदणीत विजय मिळवला. राजस्थानने १७२ धावांचे लक्ष्य मुंबई इंडियन्सने ३ गडी गमावत एकोणीसाव्या षटकात पार केले. मुंबईचा सलामीवीर क्विटंन डिकॉकला ७० धावांसाठी सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
राजस्थानने १७२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईकडून पोलार्ड फलंदाजी करत होता. यादरम्यान ख्रिस मॉरीस टाकत असलेल्या १८ व्या षटकातील तिसरा चेंडू आखुड टप्प्याचा टाकला. त्यावर पोलार्डने चेंडूपासून वाचण्यासाठी खाली बसण्याचा प्रयत्न केला. मात्र, चेंडू त्याच्या हेल्मेटवर आदळून फाईन लेगच्या दिशेने जात सीमापार गेला. यादरम्यान हेल्मेटला आदळून सीमारेषेच्या दिशेने जात असलेल्य चेंडुला पोलार्ड गमतीने हातवारे करत चेंडूला चौकारासाठी जाण्यास सांगत होता.
https://twitter.com/ribas30704098/status/1387768216357900289
जेव्हा तो चेंडू सिमापार तेव्हा पोलार्डच्या चेहऱ्यावर हास्य होते. हा प्रकार पाहून गोलंदाजी करत अलेल्या मॉरिसच्या चेहऱ्याचा रंग उडाला. तो तोंडावर ठेवत थक्क होऊन पोलार्डकडे पाहात राहिला. या घटनेबद्दल ट्विटरवर अनेक गमतीशीर प्रतिक्रिया आल्या आहेत. एका चाहत्याने ट्विट केले आहे की ‘पोलार्डच्या हेल्मेटनेही चौकार जातो.’ या सामन्यात कायरन पोलार्डने नाबाद १६ धावांचे योगदान दिले.
महत्त्वाच्या बातम्या
- गणेश नाईक भाजपची सत्ता येईल म्हणून भाजपवासी झाले, अजितदादांचा टोला
- जालन्यात मृतांना स्मशानात ही जागा मिळेना; ‘मुक्तीधाम’मध्ये पहिल्या शेडचे काम अंतिम टप्प्यात
- सामना सुरु असताना कार्तिक भीडला धवनला, ‘गब्बर’नेही दिले असे उत्तर; व्हिडीओ व्हायरल
- मुख्यमंत्री उद्धवजी सांगा गरिबांनी जगायचं कस?
- कोरोनाला घाबरु नका, त्याच्याशी दोन हात करा; १०२ वर्षीय कोरोनामुक्त आजींचा मोलाचा सल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
