🕒 1 min read
मुंबई : कोरोनाशी सामना करण्यासाठी ‘मास्क’ हा सुरक्षेसाठी सर्वात महत्त्वाचे साधन आहे. बिना मास्क घराबाहेर न पडण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत. देशात बिना मास्क घराबाहेर पडल्यानंतर दंड लावला जात आहे. मास्कचा जास्तीत जास्त वापर व्हावा यासाठी अनेक सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतलाय. यात सर्वाधिक प्रमाणात कॉटनचे मास्क शिवून त्यांचे वाटप सुरू आहे. मात्र, आता हेच कॉटनचे मास्क सुरक्षित नसल्याचा दावा मुंबई महानगर पालिकेने केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे आणखी भितीचे वातावरण तयार झाले आहे.
आपण कोणता मास्क वापरत आहोत, या संदर्भात मुंबई महानगर पालिकेच्या वतीने जनजागृती करण्यात आलीय. यामध्ये त्यांनी कॉटनचा मास्क कोरोना रोखण्यासाठी शून्य टक्के उपयोगी असल्याचे म्हटले आहे. तर नागरिकांनी केवळ ‘एन-९५’ मास्क किंवा ‘सर्जिकल मास्क’ वापरण्याचे आवाहन केले आहे. केवळ या दोन मास्कमुळेच कोरोना ९५ टक्के रोखला जावू शकतो असा दावाही या जाहिरातीमध्ये करण्यात आला आहे.
आपला मास्क विचारपूर्वक निवडा!
सर्व प्रकारचे मास्क सारख्याच प्रमाणात सुरक्षित असतील असे नाही. विविध प्रकारच्या मास्कविषयी जाणून घ्या.#NaToCorona pic.twitter.com/HiT5ZkJqjJ
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) April 30, 2021
वास्तविक केंद्र सरकारच्या वतीने आधीच कॉटनचा मात्र, दोन किंवा तीन लेअरचा मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात आले होते. देशातील सर्वाधिक नागरिक कॉटनचाच मास्क वापरत असल्याचे दिसून येते. मात्र, आता मुंबई महानगर पालिकेच्या या दाव्यामुळे नागरिकांमध्ये पुन्हा एकदा संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मागच्या १५ महिन्यांपासून तुम्ही काय करताय? उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारलं
- सुनील माने यांच्या शिवसेना कनेक्शनची सखोल चौकशी एनआयए करणार ?
- ‘हे अॅवार्ड्स ठेवायला नविन सुटकेस हवी’ पृथ्वीच्या खेळीनंतर गर्लफ्रेंड प्राचीने केली स्तुती
- कौतुकास्पद ! जिल्हा परीषद शाळेच्या मुख्याध्यापकाची लसीकरण जनजागृतीसाठी दुचाकीवरून भटकंती
- अडवाणींच्या नावे खोटे ट्विट करणाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल करणार; केशव उपाध्ये यांची माहिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
