🕒 1 min read
दिल्ली : आयपीएलमध्ये गुरुवारी झालेल्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्स संघावर ७ गडी राखुन दणदणीत विजय मिळवला. राजस्थानने १७२ धावांचे लक्ष्य मुंबई इंडियन्सने ३ गडी गमावत एकोणीसाव्या षटकात पार केले. मुंबईचा सलामीवीर क्विटंन डिकॉकला ७० धावांसाठी सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
मुंबई इंडियन्स कडुन सलामीवीर क्विटंन डिकॉक खालोखाल अष्टपैलु कृणाल पांड्याने मुंबईकडून सर्वाधिक ३९ धावा केल्या मात्र खेळी दरम्यान त्याच्या असभ्य वागणुकीमुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे. सामन्यातील पंधराव्या षटकात फलंदाजी करत असताना गोलंदाज राहुल तेवतियाच्या चेंडूवर त्याने एक चोरटी धाव घेतली. या धावेनंतर हात कोरडा झाल्याची त्याला जाणीव झाली त्यामुळे कृणालने मुंबईच्या पव्हेलियनमधून मॉइश्चरायझर मागवला. मुंबईचा अतिरिक्त खेळाडू अनुकूल रॉय मॉइश्चरायझर घेऊन आला. कृणालने ती क्रिम घेऊन हातावर लावल्यानंतर अनुकूलने मॉइश्चरायझरची बॉटल पकडण्यासाठी हात पुढे केला होता, परंतु कृणालने त्याच्याकडे न पाहता हातातली मॉइश्चरायझरची बॉटल असभ्यपणे फेकली आणि तो क्रिजकडे निघून गेला.
https://twitter.com/pant_fc/status/1387763190386278401
कृणालच्या या वागणुकीचा व्हिडीओ सोशल मीडीयावर चांगलाच व्हायरल झाला. या व्हिडीओवर चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे. काही महिन्यापुर्वी बडोदा संघाकडून सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत खेळताना संघ सहकारी दीपक हुडासोबतच्या वागणुकीनंतर तो विवादात अडकला होता. आता कृणालची अशीच काहीशी बाजू पुन्हा एकदा पाहायला मिळाली आहे. कालच्या वागणुकीनंतर अनेकांनी कृणालच्या हूडासोबतच्या जुन्या वादाचा विषय काढत त्याच्यावर टिका केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- मागच्या १५ महिन्यांपासून तुम्ही काय करताय? उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारलं
- सुनील माने यांच्या शिवसेना कनेक्शनची सखोल चौकशी एनआयए करणार ?
- ‘हे अॅवार्ड्स ठेवायला नविन सुटकेस हवी’ पृथ्वीच्या खेळीनंतर गर्लफ्रेंड प्राचीने केली स्तुती
- कौतुकास्पद ! जिल्हा परीषद शाळेच्या मुख्याध्यापकाची लसीकरण जनजागृतीसाठी दुचाकीवरून भटकंती
- अडवाणींच्या नावे खोटे ट्विट करणाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल करणार; केशव उपाध्ये यांची माहिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

