Share

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार; ट्रक चालक फरार

Published On: 

परभणी: परभणीहून गंगाखेडकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकच्या धडकेत इसाद येथून परभणीकडे येणारा मोटारसायकलस्वार ठार झाला. तालुक्यातील परभणी ते गंगाखेड रोडवर असलेल्या दैठणागावानजीक गुरुवारी सकाळी ९ च्या सुमारास हा अपघात घडला. ट्रक चालक बेभाणपणे गाडी चालवत त्यांने उभ्या असलेल्या पाच वाहनांनाही ठोकरले तर ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. अपघात स्थळी जखमींना नगरिकांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले.

गंगाखेड तालुक्यातील इसाद येथे जायकवाडी प्रकल्प विभागात नोकरीवर असलेले विजय गणेशराव पवार हे गुरुवारी गंगाखेडला ड्युटी करुन परभणीकडे आपल्या मोटारसायकल वरून येत होते. यावेळी दैठणा बस स्थानकानजीक परभणीहून गंगाखेडकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने विजय पवार यांच्या मोटारसायकलला जोराची धडक दिली. यात पवार गंभीर जखमी झाले. या ट्रकने रस्त्यावर उभ्या असलेल्या तीन दुचाकी, एक कार व एक ट्रक अशा पाच वाहनांनाही धडक दिल्याने या वाहनांचे नुकसान झाले. दरम्यान जखमी पवार यांना तातडीने परभणीच्या शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक उपनिरीक्षक लक्ष्मण मुंढे, पोहेकॉ. लक्ष्मण कातकडे, पो.ना. कुरेशी घटनास्थळी दाखल झाले. मात्र तोपर्यंत ट्रक चालक फरार झाला होता. विशाल पवार यांच्या फिर्यादीवरून दैठणा पोलीस ठाण्यात विजय पवार यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या ट्रकच्या अज्ञात चालकाविरुद्ध गुरनं. ७५/ २०२१ अन्वये कलम ३२४(अ), २७९, ४२७ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ए.एन. आदोडे करीत आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!