🕒 1 min read
मुंबई : राज्यात सर्वत्र रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. त्यातच आता राज्याला केंद्राकडून सर्वाधिक रेमडेसिवीरचा पुरवठा होणार असल्याचं वृत्त आले आहे. ही सध्या दिलासादायक बातमी असली तरी शनिवारी देखील रुग्णांच्या नातेवाईकांना आणि खासगी हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांना इंजेक्शनसाठी भटकंती करावी लागली. पुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा उपलब्ध झाला असतांनाही पुण्यातील हॉस्पिटलला त्याची माहितीच नाही. त्यामुळे पुणे प्रशासनावर भाजप नेते नीलेश राणे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
या संदर्भात नीलेश राणे यांनी सोशल मीडियावर पुणे प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘पुण्याला लोकं वणवण भटकत आहेत या औषधासाठी आणि ह्यातील काही हॉस्पिटल्सना माहीतच नाहीये त्यांच्यासाठी साठा आलाय. पुण्याचं प्रशासन कुठल्या नशेत आहे?? प्रशासनाचं काम आहे हॉस्पिटल पर्यंत साठा पोचवणं, हॉस्पिटलचे काम आहे फक्त उपचार करणे.’
पुणे प्रशासनावर उपमुख्यमंत्री अजीत पवार यांचे वर्चस्व आहे. पुण्यातील सर्व घडामोडींवर त्यांचे लक्ष आहे. त्यातच कोरोना संकटाच्या काळात रेमडेसिवीर इंजेक्शनमुळे रुग्णांचे हाल होत आहेत. त्यामुळे नीलेश राणे यांनी पुणे प्रशासनाच्या आडून सरळ-सरळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करण्याचा प्रयत्न केलाय.
महत्त्वाच्या बातम्या
- रेमडेसिविरचे प्रकरण एका मर्यादेपलीकडे ताणून धरणे मूर्खपणाचे; माजी IPS अधिकाऱ्याने सुनावलं
- कोरोना रोखण्यात राज्य सरकार पूर्णतः अपयशी! हात जोडून पाया, पडून काही होणार नाही- खा.दानवे
- ‘ताई, काळजी घ्या! वैद्यनाथ कृपेने लवकरच ठिक व्हाल’, धनंजय मुंडेंच्या खा.प्रीतम यांना सदिच्छा
- रेमडिसीवीरसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेला हेल्पलाईन क्रमांक बंद! रुग्णांनी काय करावे?
- मोठी बातमी : सीबीआय दुसऱ्यांदा देशमुखांच्या निवासस्थानी; देशमुख देखील दौरा सोडून घरी परतले


