🕒 1 min read
मुंबई : राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे रेमडेसिवीर इंजेक्शनचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून काळा बाजार मोठ्या प्रमाणात होत आहे. अशात भाजपने महाविकास आघाडीवर आरोप करत ब्रुक कंपनीमार्फत राज्यातील लोकांना रेमडेसिवीर इंजेक्शन देणार असल्याचे जाहीर केलं होतं. यानंतर, राजकीय आरोप-प्रत्यारोप चांगलंच तापलं होतं.
यावरून माजी आयपीएस अधिकारी ज्युलिओ रिबेरो यांनी भाजपला चांगलंच सुनावलं आहे. ‘रेमडेसिव्हीर इंजेक्शन तुटवड्या ब्रूक फार्मा कंपनीच्या संचालकांना जेव्हा पोलिसांनी चौकशीसाठी आणले, त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे रात्री उशिरा पोलीस स्टेशनला गेले. खरंतर रेमडेसिव्हीर इंजेक्शन कोणाला वैयक्तिक किंवा संघटनांना मिळत नाही. मी आधीच म्हटल्याप्रमाणे कोव्हिड संकटात केवळ राज्य सरकारलाच फॅक्टरीतून इंजेक्शन वितरकांपर्यंत पोहोचवण्याचा अधिकार आहे. मात्र, तरीही ब्रूक फार्माच्या पाच वेगवेगळ्या गोदामांमध्ये इंजेक्शन्सचा साठा कसा आढळून आला, हा स्वतंत्र चौकशीचा विषय आहे.’ असं मत रिबेरो यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’मध्ये लिहिलेल्या लेखात व्यक्त केलं आहे.
यासोबतच, भाजप महाविकास आघाडी सरकारवर कुरघोडी करण्यासाठी टोकाला जात आहे. ‘सुशांत सिंह प्रकरणात भाजपचा हा प्रयत्न फसला. सचिन वाझे प्रकरणात भाजप काहीप्रमाणात यशस्वी ठरली. आतादेखील भाजपने तेच करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सध्या लोकांच्या डोक्यात कोरोनाचा विषय आहे. त्यामुळे रेमडेसिविरचे प्रकरण एका मर्यादेपलीकडे ताणून धरणे मूर्खपणाचे आहे’ अशी तीव्र नाराजी व्यक्त करतानाच लोकांना देखील हे फार रुचणार नसल्याचं रिबेरो म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- पिशोरला ५० बेडचे कोविड केअर कक्ष करण्यासाठी मदत करणार : आमदार दानवे
- कोरोना रोखण्यात राज्य सरकार पूर्णतः अपयशी! हात जोडून पाया, पडून काही होणार नाही- खा.दानवे
- ‘ताई, काळजी घ्या! वैद्यनाथ कृपेने लवकरच ठिक व्हाल’, धनंजय मुंडेंच्या खा.प्रीतम यांना सदिच्छा
- रेमडिसीवीरसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेला हेल्पलाईन क्रमांक बंद! रुग्णांनी काय करावे?
- मोठी बातमी : सीबीआय दुसऱ्यांदा देशमुखांच्या निवासस्थानी; देशमुख देखील दौरा सोडून घरी परतले


