🕒 1 min read
पटना : कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) अर्थात सीपीआयएमचे महासचिव सीताराम येचुरी यांच्या मुलाचे कोरोनाने निधन झाले. आशिष येचुरी असे त्यांचे नाव आहे. सीताराम येच्युरी यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.
It is with great sadness that I have to inform that I lost my elder son, Ashish Yechury to COVID-19 this morning. I want to thank all those who gave us hope and who treated him – doctors, nurses, frontline health workers, sanitation workers and innumerable others who stood by us.
— Sitaram Yechury (@SitaramYechury) April 22, 2021
गुरुवारी सकाळी 34 वर्षीय आशिष यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती सिताराम येचुरींनी ट्विटरवरून दिली आहे. गुरुग्राममधील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, सकाळी सहाच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. आशिष यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर मेदांता रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. त्याआधी त्यांना होली फॅमिली रुग्णालयात दाखल करण्यात आली होतं. मात्र नंतर गुरुग्रामला हलवण्यात आलं होतं.
आशिष येचुरी याच्या निधनानंतर सर्वजण शोक व्यक्त करत आहेत मात्र, भाजप मृत्यूवरही राजकारण करत असल्याचं दिसत आहे. भाजपच्या एका नेत्याने आशिष येचुरी याच्या निधनानंतर आक्षेपार्ह ट्विट केले आहे. बिहारमधील भाजपचे उपाध्यक्ष मिथिलेश कुमार तिवारी यांनी सिताराम येचुरींचा मुलगा आशिष याच्या निधनानंतर आक्षेपार्ह ट्विट केलं. आपल्या ट्विटमध्ये मिथिलेश कुमार तिवारी यांनी म्हटलं, ‘चीनचं समर्थन करणाऱ्या सीपीएम सरचिटणीस सीताराम येचुरी यांचा मुलगा आशिष येचुरी याचे चायनीज कोरोनामुळे निधन.’

मिथिलेश कुमार तिवारी यांच्या ट्विटमुळे राजकारण किती नीच पातळीला पोहचले आहे याचीच प्रचीती येत आहे. तिवारी यांनी केलेल्या या ट्विटनंतर सोशल मीडिया युजर्सने त्यांच्यावर जोरदार टीका करण्यास सुरूवात केली. ट्विटरवर एका युजरने म्हटलं, लाज वाटली पाहिजे की हे लिहिण्यासाठी कुठली लस घेतली आहे. ट्विटरवर होत असलेल्या टीकेनंतर तिवारी यांना आपले ट्विट डिलीट करावे लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
- चोरट्यांनी तीन दुचाकी लांबवल्या
- दिलासा! आठ दिवसात औरंगाबादेत रुग्णसंख्या घटली
- रॉयल शेतकरी ! ३५ वर्षांनी घराण्यात मुलीचा जन्म, आजोबांनी ‘लक्ष्मी’ला हेलिकॉप्टरने आणलं घरी
- ‘जावडेकरजी, कुठे आहेत १,१२१ व्हेंटिलेटर्स ? पुण्याला विशेष कोट्यातून लस कधी मिळणार?’
- मोदींच्या मतदारसंघात ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा, नवीन रुग्ण दाखल करून न घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
