Share

दैव बलवत्तर! ऑक्सिजन संपण्याच्या ३० मिनिटांपूर्वी पोहोचला टँकर; ५०० रुग्ण बचावले

Published On: 

नवी दिल्ली : काल नाशिक येथील घटनेने देश हादरून गेला आहे. ऑक्सिजन अभावी २४ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याने देशभरातून हळहळ व्यक्त होत आहे. त्यामुळे यंत्रणेने अधिक सतर्क होत काळजी घ्यायला सुरुवात केलीय. पण नवी दिल्ली येथे सुदैवाने शेकडो रुग्णांचा प्राण वाचलाय. दिल्लीच्या जीटीबी रुग्णालयात ऑक्सिजन संपण्याच्या ३० मिनिटे आधी ऑक्सिजनचा टँकर पोहोचला. त्यामुळे सुमारे ५०० रुग्णांचे प्राण वाचू शकले.

दिल्लीच्या रुग्णालयांत ऑक्सिजनची उपलब्धता कमी असल्यावरून दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी एक ट्विट केले होते. ‘गुरू तेगबहादूर रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा आहे. जीटीबीमध्ये केवळ चार तास पुरेल एवढा म्हणजे बुधवारी पहाटे २ वाजेपर्यंतचा ऑक्सिजन आहे.’ त्यांनी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना टॅग करून समस्येवर उपाययोजनेसाठी ऑक्सिजनचा पुरवठ्याची मागणी केली.

दिल्ली किंवा इतर राज्यांना ऑक्सिजनचा पुरवठा करू नये यासाठी त्यांच्यावर दबाव आहे. मोठे संकट टाळण्यासाठी ऑक्सिजनची गरज आहे, असे सत्येंद्र जैन यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले. त्यानंतर १.३० वाजता ऑक्सिजन टँकर रुग्णालयात पोहोचला. त्यामुळे सुमारे ५०० रुग्णांचे प्राण वाचू शकले. आम्ही तर आशा सोडली होती, असे एका डॉक्टरने भावुक होऊन सांगितले. कारण, वेळ निघून जात होती. रुग्णांना ही गोष्ट कळू नये, असे डॉक्टरांना वाटत होते. ते सगळे प्रार्थना करत होते. त्याच वेळी ऑक्सिजनचा टँकर आल्याने सर्वांच्या जीव भांड्यात पडला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!