चेन्नई : आयपीएलमध्ये मगंळवारी गतविजेते मुंबई इंडियन्स आणि गत उपविजेते दिल्ली कॅपीटल्स यांच्यात झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपीटल्सने मुंबई इंडियन्सचा ६ गडी राखुन पराभव केला. मुंबई इंडियन्सने दिलेले १३८ धावांचे अव्हान दिल्लीने १९.१ षटकात ४ गडी गमावून पार केले. दिल्लीकडून ४ गडी बाद करणाऱ्या अमित मिश्राला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
मुंबई विरुद्धच्या सामन्यात निर्णायक गोलंदाजी करणाऱ्या अमित मिश्राने सामन्यानतंर त्याच्या यशाच्या रहस्याचा उलगडा केला. यावेळी मीश्रा म्हणाला की, ‘मी फक्त चांगल्या जागी गोलंदाजी करत बळी मिळविण्याचा प्रयत्न केला. मी नेहमी हवेत गोलंदाजी करतो, त्यामध्ये मला काहीही बदल करायचा नाही. यामध्ये मी अनेकदा वेगाचा वापर करतो. तसेच खेळपट्टीवर कशा प्रकारे मदत मिळवता येईल याचा विचार करत मी गोलंदाजी करून बळी मिळवण्याचा मी प्रयत्न करतो.’
मुंबई विरुद्धच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने अमित मिश्राला अंतिम ११ मध्ये स्थान दिले. अनुभवी गोलंदाज मिश्राने मुंबईच्या फलंदाजाची दांडी गुल केली. या सामन्यात मिश्राने ४ षटके गोलंदाजी करत २४ धावा देत चार गडी बाद केले होते. अमित मिश्राने मुंबईचे महत्वाचे फलंदाज रोहित शर्मा, इशान किशन आणि पोलार्ड यांच्यासह राहुल चहरला बाद केले. त्याच्या या गोलंदाजीमुळे मुंबईला या सामन्यात मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
महत्वाच्या बातम्या
- शरद पवार पुन्हा रुग्णालयात,शस्त्रक्रियेनंतर आता प्रकृती स्थिर
- ‘जुनं ते सोनं…’ म्हणत विरेंद्र सेहवागने केले सामनावीर अमीत मिश्राचे कौतुक
- कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला ५ लाख रुपयांची मदत जाहीर करा – रयत
- गटशिक्षणाधिकारी कार्यालयाचा आळशीपणा; बीडमध्ये सुद्धा मृत शिक्षकाचे नाव कोविड ड्यूटीसाठी पाठवल्याचा प्रकार
- ‘नवाब भाई… राष्ट्रवादीच्या आमदारांनीही रेमडीसीवरचा पुरवठा केला,हा औषधांचा साठा कुठून आला?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

