🕒 1 min read
चेन्नई : आयपीएलमध्ये मंगळवारी रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सचा सामना रिषभ पंतची दिल्ली कॅपीटल्स यांच्यात सामना रंगणार आहे. गुणतालीकेत दोन्ही संघाचे गुण सारखे आहेत, पण दिल्ली संघाची धावगती मुंबईपेक्षा सरस असल्याने मुंबई चौथ्या स्थानी तर दिल्ली हा दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे. दोन्ही संघानी ३ सामने खेळले आहेत, त्यापैकी एका सामन्यात पराभव तर दोन सामन्यात विजय मिळवला आहे.
स्पर्धेतील सलामीचा सामना गमावल्यानंतर मुंबई इंडिसन्यच्या संघाने सलग दोन सामने जिंकत दमदार पुनरागमन केले आहे. मुंबईचे गोलंदाज चांगल्याच फॉर्मात आहे. विजयी झालेल्या सामन्यात गोलंदाजानी चांगली कामगीरी करत संघाला विजय मिळवुन दिला. मात्र फलंदाजीत मुंबईचे खेळाडू मागे पडत आहे. कर्णधार रोहित शर्मा चांगली सुरुवात केल्यानंतर लवकर बाद होत आहे. त्यामुळे मधल्या फळीवर दबाव येत असल्याने मुंबईचा संघ मोठी धावसंख्या उभा करु शकत नाहीये.
Some not-so-fictional superheroes will take the field tonight ????
Get ready for #DCvMI ????#YehHaiNayiDilli #IPL2021 @RishabhPant17 pic.twitter.com/MWPfB27B7f
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 20, 2021
तर दुसरीकडे आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात दिल्लीने बलाढ्य चेन्नईचा पराभव करत दणक्यात सुरुवात केली होती. तर दुसऱ्या सामन्यात राजस्थान संघाकडून पराभूत झाल्यानंतर पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात विजय मिळवत पुनरागमन केले आहे. दिल्लीची खरी ताकद त्यांचे सलामी फलंदाज पृथ्वी शॉ आणि शिखर धवन आहे. मधल्या फळीतील कर्णधार पंत सोडला तर इतर फलंदाज फारशी चमक दाखवु शकलेले नाही. तर तिनही सामन्यात दिल्लीच्या गोलंदाजानी सपाटुन मार खाल्ला आहे. त्यामुळे गोलंदाजी त्याच्यांसाठी चिंतेची बाब ठरु शकते.
महत्वाच्या बातम्या
- संचारबंदीमध्ये घरगुती वीजवापराकडे लक्ष ठेवा – महावितरण
- सीबीएसई पाठोपाठ आता ‘या’ बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द !
- रेमडेसिविरची साठेबाजी करणाऱ्यांची एनआयए-ईडी मार्फत चौकशी करा; चव्हाणांची मागणी !
- जालना जिल्हात लसींचा तुटवडा; मागणी पावणेदोन लाख लसींची मिळाल्या फक्त एक हजार
- राजस्थान विरुद्धच्या सामन्यात जडेजाचे चार झेल आणि धोनीचे ‘ते’ ट्विट व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

