🕒 1 min read
नवी दिल्ली : गेल्या वर्षीपासून कोरोना रोगाने घातलेल्या संसर्गामुळे शिक्षणक्षेत्राला मोठा फटका बसला आहे. शाळा, महाविद्यालये पूर्णतः नियमितपणे सुरु करण्यात आलेले नाहीत. ऑनलाईन शिक्षणाच्या आधारावर दहावी व बारावीच्या परीक्षांचे नियोजन करण्यात आले असतानाच पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घातले आहे.
यामुळे, काही दिवसांपूर्वी सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द केल्याचे केनरीय शिक्षणमंती रमेश निशंक पोखरीयाल यांनी जाहीर केले. यासोबतच, बारावीच्या परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आल्या असून त्यांची तारीख नंतर जाहीर केली जाईल असे कळवण्यात आले होते. आता, काउंसिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स म्हणजेच आयसीएसई (ICSE) बोर्डाने परीक्षांबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे.
ICSE cancels class 10 board examinations, in the wake of #COVID19 situation. The status of exams for class 12 remains the same as the previous order – Class 12 Exam (offline) will be conducted at a later date. pic.twitter.com/59yD583ShL
— ANI (@ANI) April 20, 2021
ICSE बोर्डाची दहावीची परीक्षा रद्द करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तर बारावीची परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीनेच होईल. या परीक्षेची नवी तारीख आणि वेळापत्रक आणखी काही दिवसांनी जाहीर करण्यात येईल, असं ICSE बोर्डाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या दहावी (SSC) आणि बारावीच्या (HSC) परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘बाअदब बामुलायजा होशियार ! उमर ४५ नहीं तो क्या हुआ आखिर वो फडण २० है
- होनी को अनहोनी करणाऱ्या धोनीची डाईव्ह ; ४०व्या वर्षी ही दाखवला फिटनेस
- ‘रेमडेसिवीर मॅजिक बुलेट नाही, त्याने मृत्यू होणार नाहीत असही नाही, खरं तर…’
- रेमडेसिविरची साठेबाजी करणाऱ्यांची एनआयए-ईडी मार्फत चौकशी करा; चव्हाणांची मागणी !
- ‘या’ कारणामुळे हार्दिक गोलंदाजी करू शकत नाही, प्रशिक्षक जयवर्धन यांनी सांगितले कारण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

