Share

राजस्थान विरुद्धच्या सामन्यात जडेजाचे चार झेल आणि धोनीचे ‘ते’ ट्विट व्हायरल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएलमध्ये सोमवारी वानखेडे मैदानात झालेल्या चेन्नई सुपर किंग्स संघाने राजस्थान रॉयल्सचा ४५ धावांनी पराभव केला आहे. चेन्नईने दिलेल्या १८९ धावांचा पाठलाग करताना राजस्थानचा संघ ९ गडी गमावत १४३ धावांपर्यंत मजल मारु शकला. ३ षटंकात अवघ्या ७ धावा देत ३ गडी बाद करणाऱ्या मोईन अलीला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

या सामन्यात चेन्नईचा अष्टपैलु खेळाडू रविंद्र जडेजाने ४ झेल घेतले. जडेजाने मनन वोहरा, रियान पराग, ख्रिस मॉरिस आणि जयदेव उनाडकट या चार फलंदाजाचे झेल घेतले. यासह चेन्नईकडुन फाफ डू प्लेसिसनंतर एका सामन्यात सर्वाधिक झेल घेणारा तो दुसरा खेळाडू बनला. मात्र जडेजाच्या या विक्रमानंतर चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आठ वर्षापुर्वी केलेले ट्विट प्रचंड व्हायरल होत आहे. या ट्विटमध्ये धोनी म्हणाला होता की, ‘सर जडेजा झेल घेण्यासाठी धावत नाही, पण चेंडूच जडेजाचा शोध घेतो आणि त्याच्या हातात विसावतो.’. हे ट्विट प्रचंड व्हायरल होत आहे.

राजस्थान विरुद्धच्या सामन्यात १८९ धावांचा बचाव करण्यासाठी उतरलेल्या चेन्नईचा प्रमुख खेळाडू रविंद्र जडेजाने क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी अशी दुहेरी कामगीरी करत विजयात मोलाचा वाटा उचलला. या सामन्यात जडेजाने ४ षटकात २८ धावा देत दोन गडी बाद केले. यात खेळपट्टीवर स्थिरावलेला जोस बटलरला त्याने त्रिफळाचीत केले. तर त्याच षटकात शिवम दुबेलाही बाद करत राजस्थाच्या संघाला दुहेरी धक्का दिला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!