🕒 1 min read
मुंबई : आयपीएलमध्ये सोमवारी वानखेडे मैदानात झालेल्या चेन्नई सुपर किंग्स संघाने राजस्थान रॉयल्सचा ४५ धावांनी पराभव केला आहे. चेन्नईने दिलेल्या १८९ धावांचा पाठलाग करताना राजस्थानचा संघ ९ गडी गमावत १४३ धावांपर्यंत मजल मारु शकला. ३ षटंकात अवघ्या ७ धावा देत ३ गडी बाद करणाऱ्या मोईन अलीला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
आयपीएल स्पर्धेतील चेन्नईच्या पहिल्या सामन्यात महेंद्रसिंह धोनीला षटकाची गती संथ ठेवण्यासाठी दंड ठोठावण्यात आला. तर दुसऱ्या सामन्यात चेन्नईने निर्धारीत वेळेच्या आत सामना संपवत चाहत्यांची मने जिंकली होती. तर राजस्थानविरुद्धच्या सामन्यात दुसऱ्या डावात धोनी अपल्या सहकाऱ्याना ‘चलो चलो जल्दी जल्दी… यार एक प्लेअर गायब हो जाता है हमेशा’ असे बोलताना त्याचा आवाज स्टंम्प माईकमधून ऐकु आला. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
Listen to Ms Dhoni ????#CSK #Dhoni #RRvCSK #cskvsrr #ipl2021 #jadeja pic.twitter.com/fCkpPLGVvd
— Pranav Bhardwaj ???????? (@pranavwrites) April 19, 2021
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेकदा धोनी सहकाऱ्याना सुचना देताना व्हिडीओ अनेकदा व्हायरल झालेला प्रेक्षकांनी बघीतला आहे. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात धोनीचा तोच अंदाज पुन्हा बघायला मिळाल्याने चाहते आंनदीत झाले आहेत. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने राजस्थान रॉयल्सवर विजय मिळवून गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी झेप घेतली. चेन्नईचा हा स्पर्धेतील सलग दुसरा विजय आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘रेमडेसिवीर मॅजिक बुलेट नाही, त्याने मृत्यू होणार नाहीत असही नाही, खरं तर…’
- होनी को अनहोनी करणाऱ्या धोनीची डाईव्ह ; ४०व्या वर्षी ही दाखवला फिटनेस
- जर पराभव झाला असता तर तो माझ्यामुळे; संथ खेळीवर धोनीची कबुली
- मोठी बातमी : देशातील कोरोना स्थिती गंभीर; पंतप्रधानांनी बोलावली तातडीची मंत्रिमंडळ बैठक !
- चेन्नई सुपर किंग्सची गुणतालीकेत भरारी; मुंबई आणि दिल्लीला टाकले मागे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

