Share

चेन्नई सुपर किंग्सची गुणतालीकेत भरारी; मुंबई आणि दिल्लीला टाकले मागे

Published On: 

मुंबई : आयपीएलमध्ये सोमवारी वानखेडे मैदानात झालेल्या चेन्नई सुपर किंग्स संघाने राजस्थान रॉयल्सचा ४५ धावांनी पराभव केला आहे. चेन्नईने दिलेल्या १८९ धावांचा पाठलाग करताना राजस्थानचा संघ ९ गडी गमावत १४३ धावांपर्यंत मजल मारु शकला. ३ षटंकात अवघ्या ७ धावा देत ३ गडी बाद करणाऱ्या मोईन अलीला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

चेन्नई सुपर किंग्सचा संघ या सामन्यापूर्वी गुणतालीकेत चौथ्या स्थानावर होता. कारण चेन्नईने दोन सामन्यांत एक विजय आणि एक पराभव पत्करावा लागला होता. मात्र आजच्या सामन्यातील विजयानंतर चेन्नईच्या संघाने मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांना मागे टाकत गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले आहे. गुणतालीकेत पहिल्या स्थानी बेंगळुरु रॉयल्स चॅलेंजर संघ आहे.

चेन्नईच्या १८९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना खेळपट्टीवर स्थिरावलेल्या जोस बटलरला जडेजाने १२व्या षटकात त्रिफळाचीत केले. तर याच षटकात शिवम दुबेला बाद करत राजस्थाला दुहेरी धक्के दिले. त्यामुळे राजस्थानचा संघ दबावाखाली आला. याचा फायदा घेत मोईन अलीने यावेळी ख्रिस मॉरिस, रियान पराग आणि डेव्हिड मिलर या तिघांनाही बाद करत सामना चेन्नईच्या बाजूने झुकवला. या फिरकीपटूंच्या जोरावरच चेन्नईने राजस्थान रॉयल्सच्या संघावर दणदणीत विजय मिळवला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!