Share

चिंताजनक : परभणी जिल्ह्यात ४८ तासात ४८ कोरोनाबाधितांचा मृत्यू 

Published On: 

परभणी :  कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यात ४८ तासात ४८ कोरोनाबाधित व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याने परभणीकरांची चिंता वाढत चालली आहे. कोरोना रुग्ण संख्येबरोबरच मृताची संख्या वाढत असल्याने शहरासह ग्रामीण भागामध्ये देखील नागरिक चिंतेत पडले आहेत.

जिल्हा शासकीय रुग्णालयाने प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रसिद्धीपत्रकातून ४८ कोरोनाबाधित रुग्ण दगावल्याची माहिती दिली आहे. त्यातून रविवारी ३ पुरुष व ५ महिलांचा समावेश होता. तर सोमवारी रुग्णालयाने दिलेल्या खूलासा करतेवेळी  काढलेल्या अहवालानुसार आणखीन २४ रुग्ण मृत्यू पावल्याची माहिती मिळाली आहे. म्हणजेच रविवारी (दि. १८)  सायंकाळपर्यंतच्या २४ तासात एकूण ३२ रुग्ण मृत्यू पावले. सोमवारी सायंकाळीपर्यंतच्या अहवालात म्हणजे २४ तासात १६ रुग्ण मृत्यू पावले आहेत. सरकारी यंत्रणेने दिलेल्या अधिकृत माहितीप्रमाणे ४८ तासात ४८ कोरोनाबाधित रुग्ण मृत्यू पावल्याची माहिती निदर्शनास येत आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालयाने ४८ तासातील ४८ बाधित व्यक्तींच्या मृत्यूच्या आकडेवारीस दुजोरा दिला आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार ४८ तासातील कोरोनाबाधित व्यक्तींच्या मृत्यूच्या त्या आकड्यास दुजोरा दिला आहे.  जिल्हाधिकारी यांनी नागरिकांनी स्वत:ची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. यामध्ये मास्कचा वापर करणे, हात स्वच्छ धुणे, विनाकारण तसेच विना मास्क घराच्या बाहेर फिरु नये, सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे. तसेच कोरानाच्या लॉकडाऊन, सचारबंदीसह सर्व नियमांचे पालन करणे देखील गरजेचे असल्याचे म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!