🕒 1 min read
मुंबई : कोरोनाचा वाढता धोका पाहता १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात यावी अशी मागणी अनेक राजकीय नेते आणि वैद्यकीय तज्ञांनी केली होती. लसीकरण ही कोरोनाची साखळी तोडण्याचा एकमेव पर्याय असल्याने आता केंद्र सरकारने १ मे पासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बैठकीत आज हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. लस उत्पादकांनी 50% साठा राज्य सरकारला द्यावा, असे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत.
लसीकरण मोहिमेला वेग देण्यासाठी केंद्र सरकारनं १ मेपासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बड्या फार्मा कंपन्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला होता. दरम्यान, केंद्राच्या या निर्णयानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनीदेखील केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. ‘केंद्र सरकारनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अन्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या मागणीची दखल घेतल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे मी आभार मानतो. लसीकरणासाठी वयाची मर्यादा कमी केल्यामुळे आता कोरोनाची तिसरी लाट आल्यास त्याचा सामना करण्यासाठी मदत होईल,’ असं आदित्य ठाकरे म्हणाले.
I’m glad and grateful that the GoI has accepted what @CMOMaharashtra Uddhav Thackeray ji and many other CMs, MPs and States had requested the GoI to consider- lowering the age and covering the younger population in the vaccination drive. (1/n)
— Aaditya Thackeray (@AUThackeray) April 19, 2021
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार देशात गेल्या २४ तासांत २ लाख ७३ हजार ८१० करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर याच कालावधीत देशात १ हजार ६१९ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. रविवारी दिवसभरात १ लाख ४४ हजार १७८ रुग्ण करोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. देशातील एकूण मृत्यूचा आकडा आता १ लाख ७८ हजार ७६९ वर पोहोचला असून, १२,३८,५२,५६६ नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- नवाब मलिक यांची मानसिकता तपासण्याची गरज : खासदार डॉ. भागवत कराड
- शहरात जोरात नाका बंदी तरीही तीन दुचाकी चोरीला
- प्रत्येक कोरोना रुग्णाला ऑक्सिजन, रेमडेसिवीरची गरज नाही! केंद्रेकरांनी खासगी रुग्णालयांना फटकारले
- विद्यार्थिनीने फी न भरल्याचे सोशल मीडियावर सांगितले, शिक्षिकेवर अॅट्रोसिटी
- लवकरच पुरेसा रेमडेसिवीरचा साठा होणार उपलब्ध, सात रेमडेसिवीर निर्मात्या कंपन्यांशी चर्चा सुरु
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

