Share

मौतीवरून आलो अशी बतावणी करत कपडे आणायला जाणाऱ्यावर गुन्हा दाखल

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : कोरोना रुग्णांची वाढती संख्या आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांकडून नाका बंदी करण्यात येत आहे. त्यात विनाकारण फिरणाऱ्या लोकांची चौकशी करण्यात येत आहे. सोमवारी महात्मा फुले चौकात मौतीवरून आलो अशी बतावणी करत कपडे आणायला जाणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नजीम अजीम पटेल वय २३ रा. प्रिया कॉलनी पडेगाव असे तरुणाचे नाव आहे.

महात्मा फुले चौकात क्रांती चौक पोलिस ठाण्यांतर्गत नाका बंदी करण्यात आली आहे. दुपारी दोन जन दुचाकीवरून जात असताना. पोलीस नाईक भोकरे यांनी त्यांना अडवले. आणि कोठे जात आहे. अशी विचारणा केली, त्यावर त्यांनी मौती वरून येत असल्याचे सांगितले. तिथेच असलेल्या फौजदार गायकवाड यांना त्यांच्या गाडीला लागलेली नवीन कपड्यांची पिशवी नजरेस पडली.

त्यावर, फौजदार गायकवाड यांनी त्या दोघांना पुन्हा विचारणा केली. तर त्यांनी औरंगपुरा येथून कपडे आणल्याचे सांगितले. त्यांनी कपड्याची विक्री करणाऱ्याला कॉल केला असता. त्याला पोलिसांनी पकडल्याचे समजताच फोन बंद करून धूम ठोकली. त्यानंतर दोघांपैकी नजीमवर क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!