🕒 1 min read
नवी मुंबई : कोरोनामुळे मागील वर्षभरापासून सर्वच शाळा, महाविद्यालये बंद आहेत. या विद्यार्थ्यांचे सध्या ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. त्यासाठी बहुतांश शाळांनी विद्यार्थ्यांच्या पालकांचे व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केलेत. त्या माध्यमातून शाळेच्या वतीने मार्गदर्शन आणि सूचना देण्यात येतात. दुसरीकडे कोरोना आणि लॉकडाऊनमुळे परिस्थिती हलाखीची झाल्याने अनेक पालकांकडे शाळेची फी भरण्यासाठी पैसे नाहीत. त्यामुळे शाळांकडून फीसाठी विद्यार्थी आणि पालकांवर दबाव येत आहे.
अशातच नेरुळ येथे एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. नेरुळमधील सेंट झेव्हियर्स स्कूलमधील एका शिक्षिकेने अनुसूचित जातीच्या विद्यार्थिनीच्या फीच्या थकबाकीची माहिती इतर विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअॅपवर वैयक्तिकरित्या पाठवली. ती विद्यार्थिनी डिफॉल्टर आहे, हे दाखवून तिला इतर सर्व विद्यार्थ्यांमध्ये अपमानित केल्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे या शिक्षिकेविरोधात विद्यार्थिनीच्या पालकांनी तक्रार दाखल केल्यानंतर नेरुळ पोलिसांनी शिक्षिकेवर अॅट्रोसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, नेरुळमधील सेंट झेव्हियर्स स्कूलमध्ये नववीतील विद्यार्थिनीच्या पालकांनी शाळेची फी भरली नव्हती. शाळेकडून फी भरण्याबाबत वारंवार दबाव टाकण्यात येत होता. त्यानंतर शाळेतील नववीच्या वर्ग शिक्षिकेने अनेक मुलांच्या पालकांनी शाळेची फी भरलेली नाही, अशा विद्यार्थ्यांची नावे डिफॉल्टर यादीत टाकून व्हॉट्सअॅपवर व्हायरल केली. हा प्रकार इतर विद्यार्थ्यांकडून या विद्यार्थिनीला समजल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांमध्ये अपमानित झाल्याची भावना तिच्या मनामध्ये निर्माण झाली. त्यामुळे ती आजारी पडली.
विद्यार्थिनीच्या पालकांनी वर्ग शिक्षिकेला सदर प्रकाराबाबत जाब विचारला. इतर विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेची फी लवकर भरावी, यासाठी सदर विद्यार्थीनी डिफॉल्टर असल्याची माहिती व्हॉट्सऍपवरुन टाकल्याचे शिक्षिकेने सांगितले. दरम्यान, या प्रकारानंतर पालकाने सदर शिक्षिकेविरोधात नेरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानूसार सेंट झेव्हियर्स शाळेतील शिक्षिकेविरोधात अॅट्रोसिटी अॅक्टनुसार गुन्हा करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘अन्यथा, ऑक्सिजनचा आणखी तुटवडा निर्माण होणार’, राजेश टोपेंनी व्यक्त केली भीती
- ‘ठाकरेजी, तुमच्या वाचाळवीरांना आवर घाला’, गाढवाच्या गळ्यात आ.गायकवाडांचा फोटो घालून धिंड
- सोनियांना प्रत्युत्तर! ‘भेदभाव नाहीच, ऑक्सिजनचा सर्वाधिक पुरवठा महाराष्ट्राला’
- ‘कोरोना संकटात मोदी दिवसातील १८-१९ तास काम करताहेत’, मंत्री गोयल यांचा दावा
- ‘महाविकास आघाडी केंद्राकडे बोट दाखवून स्वतःचं अपयश लपवू शकत नाही’ :आठवले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

