Share

कचरा टाकणाऱ्यांविरोधात बारापुल्ला गेटलगत बसवल्या लोखंडी जाळ्या!

Published On: 

औरंगाबाद : खाम नदीच्या पात्राला गतवैभव मिळवून देण्यासाठी मागील काही दिवसांपासून महापालिकेकडून प्रयत्न सुरू आहेत. नदीपात्रात नागरिकांनी कचरा टाकू नये यासाठी महापालिकेच्या उद्यान विभागातर्फे लोखंडी जाळी बसविण्याचे काम सध्या सुरू आहे. शनिवारी बारापुल्ला गेटलगत लोखंडी जाळी बसविण्यात आली. महापालिकेने खाम नदीचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पात्रातील कचरा उचलून नदीकाठावर झाडे लावली जात आहेत. नागरिकांनी नव्याने नदी पात्रात कचरा टाकू नये, यासाठी पुलावर लोखंडी जाळ्या बसविल्या जात आहेत.

माझी वसुंधरा अभियान व केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत खाम नदीचे पुनरुज्जीवन केले जात आहे. त्यासाठी महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी पुढाकार घेतला असून, छावणी परिषद, व्हेरॉक आणि इको सत्व या संस्था महापालिकेला मदत करत आहेत. पहिल्या टप्प्यात नदीपात्रात अनेक वर्षांपासून पडून असलेला कचरा उचलण्यात आला. तसेच वृक्षारोपण करण्यात आले.

तसेच नदीपात्रात नागरिकांनी कचरा टाकू नये यासाठी खाम नदीवर व नदीला मिळणाऱ्या नाल्यांच्या ३० पुलावर लोखंडी जाळ्या बसविल्या जात आहेत. यापूर्वी जाफरगेट, गरम पाणी पूलावरील नाल्यावर जाळ्या लावण्यात आल्या आहेत. स्थानिकांकडून कचरा टाकण्यात येऊ नये म्हणून संरक्षक जाळी बसण्यासाठी पावले उचलली जात आहेत.

मनपाचे सहाय्यक आयुक्त नंदकिशोर भोंबे, उद्यान अधीक्षक विजय पाटील, कनिष्ठ अभियंता चांडक यांनी जाळी तयार करण्याचे साहित्य घेतले. ५० टक्के कमी खर्चात तयार झाले याचा आनंद व सुंदर रंगरंगोटी करून शहराचे सौंदर्य वाढवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यानंतरही कुणी नाल्यात पाणी नदीत कचरा टाकण्याचा प्रकार दिसून आल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. हा प्रकल्प स्वच्छ भारत अभियान व महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियानांतर्गत राबविण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!