🕒 1 min read
नवी दिल्ली : देशात कोरोनाचे संकट बिकट झाले आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान मोदी बंगाल निवडणुकीत व्यस्त असल्याचा आरोप विरोधकांकडून होतोय. पण कोरोनाविरुद्धच्या लढ्यात केंद्र सरकार दिवसरात्र काम करत असल्याचं मत केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केलं आहे. पंतप्रधान मोदी दिवसातील १८ ते १९ तास काम करत असल्याचा दावा गोयल यांनी केलाय.
एएनआय या वृत्तसंस्थेला पियुष गोयल यांनी मुलाखत दिली आहे. त्यात म्हटले आहे की, केंद्र सरकार करोनाविरुद्धच्या या लढ्यामध्ये कोणताही भेदभाव करत नसल्याचं गोयल यांनी म्हटलं आहे. केंद्र कोणताही भेदभाव करत नसल्याने या विषयावरुन राजकारण केलं जाऊ नये. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पश्चिम बंगालच्या निवडणूक दौऱ्यावरुन परतल्यानंतरही दिवसातील १८ ते १९ तास काम करत असल्याचं म्हटलं आहे. निवडणूक प्रचार संपवून परतल्यानंतर मोदींनी देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला.
विरोधकांवर टीका करताना गोयल यांनी कोणाचंही नाव घेतले नाही. सोनिया गांधी यांनी शनिवारी भाजपा सरकारकडून काही राज्यांना झुकतं माप दिलं जात असल्याची टीका केली होती. काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीच्या सुरुवातीलाच काँग्रेसची सत्ता असणाऱ्या राज्यातील मुख्यमंत्र्यांनी मदतीसाठी केंद्राला पत्र पाठवल्याचं सोनिया यांनी म्हटलं होतं. त्यावरून ‘जे नेते नीट काम करत नाही त्यांना काम सादर करण्यासंदर्भातील चिंता करावी लागतेय’, असा टोला गोयल यांनी लगावला.
महत्वाच्या बातम्या
- ‘असे’ तळीराम पाळायची सवय फडणवीसांना, संजय गायकवाडांचे जोरदार प्रत्युत्तर
- महाराष्ट्र सरकारची चिंता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली पाहिजे – अमित शहा
- औरंगाबादेत कोरोनाचा विस्फोट नाहीच! परिस्थिती नियंत्रणात असल्याचा मनपा आयुक्तांचा दावा
- विदर्भाला अमानवीय रित्या कोरोना उपाययोजनांबाबत बाजूला टाकण्यात येतंय-बावनकुळे
- तोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगे! अपघातात दोन जिवलग मित्रांचा मृत्यू


