Share

विदर्भाला अमानवीय रित्या कोरोना उपाययोजनांबाबत बाजूला टाकण्यात येतंय-बावनकुळे

Published On: 

🕒 1 min read

नागपूर : जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना राज्य सरकारच्या वतीने जिल्ह्याला मदत करण्यात आलेली नाही. राज्य शासन इतर जिल्ह्यांना मदत करत असले तरी विदर्भाला मुद्दाम डावलले जात असल्याचा आरोप माजी मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. यात तत्काळ मदत मिळावी यासाठी त्यांनी नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या मांडला.

या संदर्भात बावनकुळे म्हणाले की, ‘राज्यशासनाद्वारे नागपूर – विदर्भाला अमानवीय रित्या कोरोना उपाययोजनांबाबत बाजूला टाकण्यात येतंय. रेमेडिसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन आणि इतर अत्यावश्यक वैद्यकीय मदतीची मुक्तहस्ते भेदभावात्मक उधळण आम्हांला वगळता सर्वत्र होत आहे. आमची माणसं रोज दूर होत आहेत, रडत आहेत, कोसळत आहेत. राज्य शासनाने न्याय देत नागपूर-विदर्भावरचा पाशवी आसूड रोखत माणुसकी दाखवावी.’

नागपूरला तत्काळ रेमडेसिवीर इंजेक्शनची आवश्यकता आहे. यात कोणतेही राजकारण करण्याची आमची इच्छा नाही. राज्य सरकारमधील वजनदार मंत्री त्यांच्या जिल्ह्यातील एका रुग्णासाठी ३ रेमडेसिवीर इंजेक्शन राखून ठेवत आहे. नागपूरमध्ये मात्र, गेल्या ३ दिवसांपासून इंजेक्शन मिळालेले नाही. हा अन्याय दूर करण्यासाठी आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असल्याचेही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!