🕒 1 min read
औरंगाबाद : एकीकडे सिल्लोड तालुक्यात रुग्ण वाढीची मालिका सुरुच आहे. तर दुसरीकडे लसीचा साठा संपल्याने लसीकरणाला ब्रेक लागला आहे. लस संपल्याने शुक्रवारी तालुक्यात अवघ्या ६१ जणांना लस घेता आली. या आजारापासून बचावासाठी लस मोठी मात्रा असल्याने ४५ वर्षावरील नागरिकांमधून लसीकरणाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. परंतु लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने नागरिकांना आल्या पावली परत जावे लागत आहे.
कोरोनाला हद्दपार करण्यासाठी शासनाने दि.१७ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात केली आहे. यात सुरुवातीला शासनाने प्रंâट लाईनच्या कर्मचाNयांना लस दिली. आरोग्य विभागाने जनजागृती केल्याने नागरिक स्वयंमस्पुâर्तीने पुढे आले. यामुळे आरोग्य विभागाने शहरातील उपजिल्हा रुग्णालय, अजिंठा ग्रामीण रुग्णालय, सर्व प्राथमिक, उपआरोग्य केंद्रासह बाजार पेठ व मोठ्या गावांमध्ये लसीकरण शिबिर घेतले. तालुक्यात आतापर्यंत जवळपास २४ हजार नागरिकांनी लस देण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने नागरिकांचा कल लसीकडे वाढत असताना लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे.
तालुक्यात गुरुवारपासून लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने शुक्रवारी उपजिल्हा रुग्णालयात ३० तर आमठाणा प्राथमिक आरोग्य केंद्रांत ३१ नागरिकांच लस घेता आली. तर शिवणा, अंधारी, पालोद, उंडणगाव, पानवडोद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांत लसी अभावी लसीकरण बंद असल्याने नागरिकांना लस न घेता परत जावे लागले. तालुक्यात रुग्ण मिळण्याची मालिका सुरुच असल्याने रुग्णालयांमध्ये आधीच गर्दी आहे. त्यात लसीकरणाला ब्रेक लागल्याने नागरिकांमधून तिव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
तालुक्यात रुग्ण मिळण्याची मालिका सुरुच असून शनिवारी तब्बल १२५ रुग्ण मिळाले. यात शहरातील २५, चिंचपूर १७, पालोद १५, शिवणा ९ रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत रुग्ण मिळण्याचा हा सर्वात मोठा आकडा आहे. तालुक्यात १ हजार १२० जणांना कोरोनाची लागन झाली आहे. तर २६ जणांचा मृत्यू झाला आहे. शहरात जवळपास ४०० नागरिक बाधित झाले आहे. शहराचे नागरिकरण झपाट्याने वाढलेले असताना शहरात फक्त उपजिल्हा रुग्णालयात लस देण्यात येत आहे. शहराचा विस्तार पाहता शहरात अजून लसीकरण केंद्र सुरु करणे गरजेचे आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- देवदूता प्रमाणे रेल्वे पॉईंटमनने वाचवला चिमुकल्याचा जीव, रेल्वेमंत्र्यांनी केले कौतूक
- कोरोना योद्ध्यांच्या मानधनात दुजाभाव; आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार
- दिलासादायक : कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी नेझेल स्प्रे ठरतोय ९९ टक्के प्रभावी
- …तर विरोधी नेत्यांना देखील रेमडेसिवीरच श्रेय घेता आलं असतं – संजय राऊत
- ‘निर्बंधकाळात नागरिकांसाठी जाहीर केलेली मदत पोहचवण्याची युद्धपातळीवर कार्यवाही’


