Share

तोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगे! अपघातात दोन जिवलग मित्रांचा मृत्यू

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : हायवा चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने पाठीमागून येणारी भरधाव रिक्षा हायवावर आदळून दुर्दैवी अपघात झाला. या अपघातात दोन जिवलग मित्र ठार झाले. हा अपघात पैठण रोडवरील गेवराईजवळ रविवारी रात्री घडला. हबीब इसाक चाऊस (३०) व अफरोज पठाण (३५, दोघेही रा. अरबगल्ली, बिडकीन) अशी मृत तरुणांची नाव आहेत.

बिडकीन येथील हबीब आणि अफरोज हे दोघेही रिक्षा चालक तसेच लहानपणापासूनचे जिवलग मित्र होते. दररोज शहरात येऊन दिवसभर रिक्षा चालविल्यानंतर रात्री परत गावाकडे जायचे. रविवारी देखील दोघांनी दिवसभर रिक्षा चालविली. त्यानंतर रात्री साडेआठच्या सुमारास बिडकीनच्या दिशेने निघाले होते.

गेवराई गावाजवळ येताच समोरून जात असलेल्या हायवा चालकाने अचानक ब्रेक दाबले. त्यामुळे पाठीमागून येणारी दोघांची रिक्षा (एमएच-२०-ईएफ-१२८४) हायवावर धडकली. या अपघातात रिक्षातील हबीब आणि अफरोज गंभीर जखमी झाले. दोघांना नागरिकांनी तात्काळ घाटीत दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान हबीब आणि अफरोज यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!