Share

लातूरात एकाच दिवसात ५० कोरोना रुग्णांच्या मृत्यूची बातमी चूकीची, जिल्हाधिकाऱ्यांनी केला खुलासा

Published On: 

लातूर: जिल्ह्यात कोरोनामुळे ५० रुग्ण दगावले असल्याची बातमी समोर आली आणि एकाच खळबळ उडाली. लातूर जिल्ह्यात एकाच दिवसात ५० रुग्ण कोरोनामुळे दगावले असे वृत्त सर्वत्र पसरले होते. मात्र या बातमीत कुठलेही तथ्य नसल्याचे समोर आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी ही बातमी चुकीची असल्याचे सांगितले असून खरी आकडेवारी देखील त्यांनी या वेळी प्रेस नोट मधून सांगितली आहे.

जिल्ह्यात पोर्टलवर एकूण तीन दिवसाच्या ५० मृत्यू अपलोड केलेले असल्यामुळे एकूण मृत्यूची संख्या ९३४ एवढी झालेली आहे. रविवारी एका दिवसात एकूण ५० मृत्यू झालेले नसून ते तीन दिवसात झालेले आहेत, असा खुलासा प्रेस नोट द्वारे जिल्हाधिकाऱ्यांनी केला आहे. दिनांक १६ एप्रिल ते १८ एप्रिल या तीन दिवसांची एकूण मृत्यूची आकडेवारी ५० आहे. दि. शुक्रवारी एकूण १३ जण कोरोनामुळे दगावले असून शनिवारी हा आकडा २६ होता तर रविवारी एकूण ११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, असे एकूण ५० रुग्ण तीन दिवसात दगावले आहेत.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. तसेच या वाढत्या कोरोनाला रोखण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत असून कडक निर्बंध तसेच संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नागरिकांनी स्वतःची काळजी घेत घरातून विनकारण बाहेर पडू नये, असे आवाहन येथील स्थानिक प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!