🕒 1 min read
लातूर: लातूर ग्रामीण पोलिसांनी बेकायदेशीररित्या देशीदारूची वाहतूक करणाऱ्या दोन कारमध्ये भिंगरी देशी दारुचे ५५ बॉक्स जप्त केले आहेत. जप्त करण्यात आलेली देशीदारू १ लाख ३७ हजार रुपयांची असून, ही कारवाई लातूर तालुक्यातील उमरगा येथे करण्या आली. या प्रकरणी चौघांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
उमरगा येथे एक पांढऱ्या रंगाची सफारी कार व एक फोर्ड कंपनीची इकोस्पोर्ट कारमधून काही लोकं देशी दारुची चोरटी वाहतूक करणार असल्याची माहिती लातूर ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश कदम व त्यांच्या साथीदारांना मिळाली होती. माहिती मिळताच त्यांच्या पथकाने रविवारी रात्री १.३० वाजता छापा मारला असता सदर छाप्यामध्ये भिंगरी कंपनीचे देशी दारुचे ५५ बॉक्ससह कारमधील चार इसमांना पकडण्यात आले. सदर छाप्यामध्ये देशी दारुसह एकूण १ लाख ३७ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करुन चार जणांविरुध्द पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
आरोपी हरिश्चंद्र पांचाळ, गोविंद केंद्रे, भागवत पाटील, राहुल गोडेलवार यांना अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- सामना गमावला मात्र, राहुल-मंयकच्या जोडीने तोडला ५ वर्षे जुना विक्रम
- गर्दी कमी झाली नाही तर, कडक लॉकडाऊन करणार : पालकमंत्री अशोक चव्हाण
- नगरमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची निर्मिती करा, मुख्यमंत्री ठाकरेंना निवेदन
- वॉर्नर, विल्यमसननं राशिद खानसोबत केला रमजानचा रोजा
- खा.भावना गवळी यांनी घेतला कोरोना परिस्थितीचा आढावा


