Share

सामना गमावला मात्र, राहुल-मंयकच्या जोडीने तोडला ५ वर्षे जुना विक्रम

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएलमध्ये रविवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपीटल्स संघाने पंजाब किंग्सच्या संघाचा ६ गडी राखुन दणदणीत विजय मिळवत दमदार पुनरागमन केले आहे. पंजाब किंग्सने दिलेले १९६ धावांचे कठिण लक्ष्य चार गडी गमावत १९व्या षटकातच पार केले. धावांचा पाठलाग करताना ९२ धावांची खेळी करणाऱ्या शिखर धवनला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्सच्या संघाने २० षटकांत १९५ धावांचे लक्ष्य दिल्ली कॅपीटल्ससमोर ठेवले. या सामन्यात पंजाबची सलामीची जोडी के एल राहुल आणि मंयक अग्रवाल यांनी या सामन्यात १२२ धावांची सलामी देत आयपीएलमध्ये दिल्ली कॅपीटल्सविरुद्ध सर्वोत्तम सलामी दिली. याआधी २०१६ साली झालेल्या आयपीएल स्पर्धेत गुजरात लॉयन्सच्या ड्वेन स्मिथ आणि ब्रेन्डन मॅक्युलम यांनी ११२ धावांची सलामी दिली होती. तो विक्रम आज राहुल-मयंक जोडीने तोडला.

राहुल-मंयक जोडीने पंजाब संघाला मागील सत्रात अनेकदा शतकी सलामी देत संघाला चांगली सुरुवात करुन दिली आहे. दिल्ली विरुद्धच्या सामन्यात मंयक अग्रवालने अवघ्या ३६ चेंडुत ७ चौकार आणि ४ षटकारासह ६९ धावांची खेळी केली. त्याला कर्णधार के एल राहुने ५१ चेंडुत ७ चौकार आणि २ षटकारासंह ६१ धावा केल्या होत्या.

दिल्ली विरूद्ध सर्वोच्च सलामी भागीदारी –
१) १२२ – केएल राहुल व मयंक अगरवाल – २०२१*
२) ११२ – ड्वेन स्मिथ व ब्रेन्डन मॅक्युलम – २०१६
३) १०८ – राहुल द्रविड व अजिंक्य रहाणे – २०१३

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!