Share

‘परंतु हे कोलकाताचे दुर्दैव आहे की त्यांच्याकडे असा खेळाडू आहे’

Published On: 

🕒 1 min read

चेन्नई : वेस्ट इंडिजचा अष्टपैलू आंद्रे रसेल सध्याच्या आयपीएल स्पर्धेत संघर्ष करताना दिसत आहे. कोलकाता नाईट रायडर्सचे प्रतिनिधित्त्व करणाऱ्या रसेलला आयपीएल २०२० पासून सूर गवसलेला नाही. त्याला या मोसमात एकही अर्धशतक करता आलेले नाही. आयपीएलमध्ये आतापर्यंत झालेल्या ३ सामन्यात त्याला उत्तम कामगिरी करण्याची संधी होती. परंतु तो अपयशी ठरला. आतापर्यंतच्या ३ सामन्यात त्याने फक्त ४५ धावा केल्या. आता रसेलच्या फलंदाजीबद्दल इंग्लंडचा माजी कर्णदार मायकल वॉनने मोठे वक्तव्य केले आहे.

वॉन म्हणाला की, “जेव्हा रसेल लयीत असतो, तेव्हा तो शानदार प्रदर्शन करतो. परंतु तो सहसा मैदानावर गोलंदाजी करताना संघर्ष करताना दिसतोय. सोबतच त्याला साध्या २ धावाही पळून काढता येत नाहीत. बेंगलोरविरुदधच्या सामन्यात १९ व्या षटकात त्याने २ धावा घेण्याची गरज होती. कारण यावेळी त्याने स्ट्राईक स्वत:कडे ठेवणे महत्त्वाचे होते. कोलकाताचे प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम आणि कर्णधार ऑएन मॉर्गन यांना या पैलूंवर काम करावे लागणार आहे.”

“माझ्या मते, आधुनिक क्रिकेटमध्ये कोणत्याही संघाकडे ९-१० असे खेळाडू हवेत, जे मैदानावर उत्स्फुर्तीने आणि चपळतेने खेळतील. परंतु सध्याच्या कोलकाता संघाकडे पाहिल्यावर असे काही जाणवत नाही,” पुढे तो म्हणाला, “हे कठीण आहे. तुम्ही त्याला संघाबाहेर ठेवू शकत नाही. परंतु हे कोलकाताचे दुर्दैव आहे की त्यांच्याकडे असा खेळाडू आहे, जो आपल्या शरीरामुले संघर्ष करताना दिसत आहे.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!