🕒 1 min read
मुंबई : रेमडेसिवीर औषधांची निर्यात करणाऱ्या ब्रुक फार्मा या कंपनीचे संचालक राजेश डोकानिया यांना पोलिसांनी ताब्यात घेतले व रात्री त्यांना अटक झाल्याचे समजताच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी पार्ले येथील पोलीस ठाण्यात धाव घेतली होती.
यावेळी पोलीस आणि भाजप नेत्यांमध्ये शाब्दिक वादावादी झाल्याचे देखील समजत आहे. दरम्यान, कंपनीच्या संचालकांकडे जवळपास 60 हजार रेमडेसिवीरचा साठा असल्याच्या संशयावरून त्यांना चौकशीसाठी विलेपार्ले पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यांनी चौकशी दरम्यान सर्व लीगल पेपर्स दाखवल्याने त्यांना अटक न करता चौकशी करून सोडून देण्यात आलं आहे.
रेमडेसिवीर औषधाचा पुरवठा आणि साठेबाजीवरून महाराष्ट्रात राजकारण तापलं असताना काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. ‘भाजप नेत्याचे हे कृत्य मानवतेविरोधात,’ असल्याची घणाघाती टीका प्रियंका गांधी यांनी केली आहे. त्या म्हणाल्या, कि ‘देशातील कानाकोपऱ्यात लोक रेमडेसिवीर औषध मिळावे यासाठी वणवण फिरत आहेत. आपला जीव वाचावा म्हणून रेमडेसिवीर इंजेक्शन मिळावे यासाठी लोक सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत एका जबाबदार पदावर राहिलेले भाजपचे नेते रेमेडेसिवीर ओषधाची साठेबाजी करतात हे मानवतेविरोधात आहे.’
जब देश के कोने-कोने से लोग रेमडेसिविर उपलब्ध कराने की गुहार लगा रहे हैं और तमाम लोग जान बचाने के लिए किसी तरह एक शीशी रेमडेसिविर जुटाने के लिए जद्दोजहद कर रहे हैं, उस समय जिम्मेदार पद पर रह चुके भाजपा नेता का रेमडेसिविर की जमाखोरी करने का कृत्य मानवता के खिलाफ अपराध है। pic.twitter.com/arIl5fTnGO
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) April 19, 2021
प्रियंका गांधी यांनी ही प्रतिक्रिया ट्वीट केली असून यात एक व्हिडिओही पोस्ट केला आहे. प्रतिक्रिया देत असताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा थेट उल्लेख केला नसला तरी त्यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये देवेंद्र फडणवीस पोलिसांशी चर्चा करत असताना दिसतात.
महत्वाच्या बातम्या
- बायकोने ‘दूध का नाही आणले’ विचारताच पतीने दिला तलाक, औरंगाबादेतील घटना
- गर्दी कमी झाली नाही तर, कडक लॉकडाऊन करणार : पालकमंत्री अशोक चव्हाण
- नगरमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची निर्मिती करा, मुख्यमंत्री ठाकरेंना निवेदन
- वॉर्नर, विल्यमसननं राशिद खानसोबत केला रमजानचा रोजा
- खा.भावना गवळी यांनी घेतला कोरोना परिस्थितीचा आढावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

