Share

केज येथील कोविड सेंटरमध्ये वेळेवर जेवण मिळत नसल्याने रुग्णांचे हाल

Published On: 

बीड: गेल्या अनेक दिवसांपासून रुग्णांची संख्या वाढतच आहे, अशात कोविड सेंटरची संख्या देखील वाढवण्यात येत आहे. रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने अनेक रुग्णालयांमध्ये खाटांची संख्या अपुरी पडत आहे. कोविड सेंटर उभारले तरी देखील रुग्णांचे हाल होत असल्याचे चित्र समोर येत आहे. केज येथील कोविड सेंटरमध्ये रुग्णांना वेळेवर जेवण मिळत नसल्याची तक्रार येथील रुग्णांकडून केली जात आहे.

केज येथे शारदा इंग्लिश स्कूल आणि पिसेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहात कोविड केअर सेंटर आहेत. दोन्ही सेंटरमधील जेवणाचे कंत्राट एकाच ठेकेदाराकडे आहे. ठेकेदाराकडून वेळेवर जेवण मिळत नाही. त्यामुळे रुग्णांची उपासमार होऊ लागली आहे. वेळेवर जेवण आणि पाण्याची व्यवस्था होत नसल्याची तक्रार रुग्णांनी शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांकडे केली होती. रविवारी दोन्ही सेंटर भेट देत जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी जेवण व पाण्याची व्यवस्था केली. यावेळी ठेकेदारालाही त्यांनी चांगलेच सुनावले.

कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना अंघोळीसाठी देखील पाणी मिळत नसल्याची तक्रार रुग्णांकडून होत आहे तसेच या सर्व तक्रारी त्यांनी सचिन मुळूक यांच्याकडे केली.यानंतर तातडीने जिल्हा प्रमुख सचिन मुळूक, तालुका प्रमुख रत्नाकर शिंदे यांनी दोन्ही कोविड सेंटरला भेट दिली. जिल्हाधिकारी, तहसीलदार, जिल्हा शल्य चिकित्सक, रुग्णालयाचे अधीक्षक यांच्याशी संपर्क साधून याबाबत तक्रार केली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!