🕒 1 min read
औरंगाबाद : संचारबंदीच्या काळात आजपासून रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची हयगय केली जाणार नाही. ज्यांच्याकडे बाहेर फिरण्याचे सबळ कारण नाही. अशांची आजपासून (दि.१६) शहरातील ठिकठिकाणावर ऑन दि स्पॉट कोरोना तपासणी सुरु करण्यात आली आहे. यात पहिल्याच दिवशी सकाळच्या सत्रात विनाकारण फिरणारा एक तरुण महानुभाव आश्रम चौकात पॉझिटिव्ह निघाला असून त्यास मनपाच्या कोविड सेंटरमध्ये भरती करण्यात आले आहे. त्यामुळे जर तुमची टेस्ट करण्याची संपूर्ण तयारी असेल तरच घराबाहेर पडा. असे आवाहन मनपा आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
शहरात दररोज दिड हजारांच्या घरात कोरोना रुग्ण निघत आहेत. शहरातील अनेक भाग हॉटस्पॉट म्हणून जाहिर केले आहेत. राज्यातील वाढती रुग्णसंख्या पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण राज्यात १४ एप्रिलला रात्री ८ वाजेपासून संचारबंदी लागू केली आहे. मात्र संचारबंदीच्या पहिल्याच दिवशी गुरुवारी (दि.१५) रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या मोठी होती. कुठलेही योग्य कारण नसतांना संचारबंदीतही अनेक जण रस्त्यावर फिरतांना दिसून आले.
त्यामुळे आता नाहक फिरणाऱ्यांवर चोप बसावा यासाठी महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने मोबाईल व्हॅनद्वारे कोरोना तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील चौकाचौकांमध्ये बेजबाबदारांना पकडून मोबाईल व्हॅनमध्ये कोरोना तपासणी करण्यात येणार आहे. शहरात विनाकारण फिरणाऱ्यांवर आता मोबाईल व्हॅनची नजर असणार आहे. मनपा आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने बेजबाबदार नागरिरांविरोधात हे पाऊल उचलण्यात आले आहे. मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी गुरुवारी रात्री ट्विट करत हि माहिती दिली.
हे ठिकाण ‘टार्गेट’वर
सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पहिली शिफ्ट आणि सायंकाळी ५ ते रात्री १ या दरम्यान दुसरी शिफ्ट यामध्ये बारा मोबाईल टिम्स सक्रिय असणार आहेत. यात सर्वाधिक वर्दळीचे आणि मुख्य मानले जाणारे औरंगपुरा चौक, रेल्वेस्टेशन चौक, दिल्लीगेट, टिव्ही सेंटर चौक, आकाशवाणी चौक, महानुभव चौकात विनाकारण फिरणाऱ्यांची कोविड टेस्ट करण्यात येणार आहे. आज (दि.१६) पहिल्याच दिवशी टिव्ही सेंटर, उस्मानपुरा, सिटी चौक, एन-१ पोलीस चौक याठिकाणी विनाकारण फिरणाऱ्यांच्या अँटिजेन टेस्टिंग सुरु झाल्या आहेत.
टेस्टिंग बरोबरच पोलीसांची कडक चेकिंग
आरोग्य विभाग आणि पोलीस यांच्याद्वारे विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना तपासणी तर सुरुच आहे. मात्र त्याचबरोबर पोलीसांद्वारेही शहरातील विविध नाक्यांवर कडक तपासणी सुरु आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘भाऊ, ‘तो’ हक्क फक्त तुम्हालाच आहे!’, पंकजांचा धनंजय मुंडेंवर पलटवार
- ‘बंगालमध्ये कोरोनाचा कहर, उर्वरीत निवडणुक एकाच टप्प्यात घ्या’
- उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या विचारांची कास धरावी- दरेकर
- रोहित, विराट पोस्टपेड तर संजु हा प्रीपेड सिम कार्ड; प्रज्ञान ओझाचा सॅमसनला उपदेश
- संजय राऊतांचे ‘ते’ वक्तव्य कंपाउंडरने घेतले मनावर, डॉक्टर बनून केले कोरोना रुग्णांवर उपचार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
