Share

मोठी बातमी : कडक निर्बंधांना कोणी जुमानेना, आता निर्बंध आणखी कठोर होण्याची शक्यता !

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोना रोगाने थैमान घातला आहे. यामुळे आरोग्य सेवा देखील अपुऱ्या पडत असून हे संकट पुन्हा एकदा गडद होत असल्याचं चित्र निर्माण होत आहे. यामुळे महाराष्ट्रात १४ एप्रिल रात्री आठ वाजल्यापासून ते १ मे सकाळी ७ वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्यात १४४ कलम म्हणजेच संचारबंदी लागू करण्यात आली असून अतिमहत्वाचे व अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांना बाहेर फिरता येणार नाही, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

मात्र, आज (१५ एप्रिल) रोजी अनेक ठिकाणी गर्दी आटोक्याबाहेर गेल्याच चित्र समोर आलं आहे. त्यामुळे नक्की संचारबंदी आहे की नाही ? असा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. नागरिकांच्या सोयीसाठी भाजीपाला, किराणा व इतर आवश्यक सुविधा सुरु ठेवण्यात आले आहेत. मात्र, तरीदेखील नागरिक किराणा दुकानाबाहेर, भाजी मार्केटमध्ये, लोकलमध्ये मोठी गर्दी करत असल्याने नियम अधिक कठोर केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राज्यात सुरु असलेला लॉकडाऊन आणखी कडक होणार आहे. गर्दी कमी होत नसल्याने सरकारने हा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे. लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे दोन दिवसात कडक कारवाई केली जाणार आहे. सर्वसामान्यांना पेट्रोल-डिझेल न देण्याबाबत तसेच भाजीपाला व किराणा खरेदी साठी देण्यात आलेल्या सूटमध्ये देखील कपात करण्याबाबत सरकार विचाराधीन आहे. त्यामुळे जनतेला एक दिवसाचा अवधी आहे. विनंती करतो नियम पाळा, अन्यथा आणखी कठोर नियमांशिवाय पर्याय उरणार नाही असं देखील वडेट्टीवार म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!