Share

कोरोनाच्या या संकटात एकमेकांची साथ गरजेची!

Published On: 

औरंगाबाद : कोरोना हे संपूर्ण जगावर आलेले मोठे संकट आहे. हे संकट दूर करण्यासाठी राजकीय दृष्टिकोन बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र यावे. तसेच शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधींनी या मोहिमेत समन्वय ठेवणे आवश्यक असल्याचे तसेच एकमेकांची साथ महत्वाची असल्याचे प्रतिपादन एमजीएमचे ट्रस्टी माजी प्राचार्य प्रतापराव बोराडे यांनी क्रांती चौक येथील कार्यक्रमात केले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या ब्रेक द चेन या मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी कोरोना जनजागृती प्रशासन सहयोग समितीच्या वतीने मंगळवारी (दि. १३) क्रांती चौक येथे चला एक मेणबत्ती लावू या, हे अभियान घेण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोरोना जनजागृती प्रशासन सहयोग समितीचे निमंत्रक इंजि. मिलिंद पाटील यांनी केले. कोरोना काळात राजकीय हेवेदावे दूर ठेवून वर्तमान परिस्थितीत मार्ग काढण्याची गरज असून कोरोना साखळी खंडित करण्यासाठी समिती जनप्रबोधन करत असल्याचे त्यांनी यावेळी संगितले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्या सूर्यकांता गंगाधर गाडे होत्या. कोरोनामुळे उध्वस्त होत असलेल्या उपेक्षित, वंचित घटकांच्या सहकार्यासाठी शासन, प्रशासन व सामाजिक संघटनांनी मदतीचा हात दिला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी कोरोना नियम पाळून ६ ते ८ च्या दरम्यान क्रांती चौकात मेणबत्ती पेटवून ब्रेक द चेन या अभियानाला पाठिंबा देण्यात आला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!