बीड: मागील आठवड्यात अंबाजोगाईतील दाम्पत्यांच्या अमेरिकेतील हत्या व आत्महत्येमुळे संपूर्ण जिल्हा हादरलेला असताना, या घटनेतील नवीन माहिती मिळाल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. बालाजी रुद्रावार आणि आरती रुद्रावार यांच्या हत्या आणि आत्महत्येनं एक अख्खं कुटुंब उद्धवस्त झालं आहे. ज्या आरतीचा खून बालाजीनं केला ती आरती 7 महिन्यांची गरोदर होती, यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. एवढंच नाही तर आरतीच्या पोटात मुलाचा गर्भ होता असंही अमेरिकन न्यूज एजन्सीनं बातमी दिली आहे. डेली व्हॉईसमध्ये हे वृत्त प्रकाशित झालं आहे.
दरम्यान आरती आणि बालाजी यांच्या साडे तीन वर्षाच्या मुलीच्या भविष्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. या चिमुकलीचं नाव विहा असून तीच बालकनीत रडत उभी होती. ती का रडते आहे याची चौकशी केली असता, आरती आणि बालाजीचं हत्या आत्महत्येची घटना उघड झाली. विहाला भारतात आणण्याचा प्रयत्न केला जातो आहे तसच तिच्यासाठी अमेरिकेत डोनेशन उभं केलं जात आहे. आणि त्याला दोन हजारपेक्षा जास्त दात्यांनी सढळ हाताने मदत केली आहे. विहाला अमेरिकेतच दत्तक द्यायचं की अंबाजोगाईला आणायचं यावर संभ्रम होता पण ती काही काळ तरी अंबाजोगाईला येणार अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
गेल्या बुधवारी अमेरिकेतल्या न्यूजर्सी भागात बालाजी रुद्रावारनं त्याची पत्नी आरती रुद्रावार हिचा चाकूनं भोसकून खून केला. आरती त्यावेळेस 7 महिन्यांची गरोदर होती. बालाजीनं तिच्या पोटाचे स्लाईस केल्याची माहिती कोर्टात देण्यात आली आहे. खुद्द बालाजीच्या अंगावर तेवढ्याच गंभीर जखमा होत्या. त्यातल्या काही दोघांच्या झटापटीत झालेल्या होत्या तर काही खुद्द बालाजीनं स्वत:वर वार करुन घेतल्याचं उघड झालं आहे. म्हणजेच बालाजीनं आधी आरतीचा खून केला आणि नंतर आत्महत्या. या सगळ्यात एकाच चाकूचा वापर करण्यात आल्याचही कोर्टात सांगण्यात आलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- तीन दिवस रांगेत थांबूनही रेमडिसिव्हीर मिळेना, पुण्यात रुग्णांच्या नातेवाईकांचे आंदोलन
- ‘शेतकरी, सलून चालक, फुल विक्रेते, मुंबईचे डबेवाले आणि छोट्या व्यावसायिकांनाही आर्थिक मदत द्या’
- ब्रेक द चेन! जालना जिल्ह्यात कडक निर्बध लागू, विनाकारण फिरण्यास मनाई
- विराटने दिलेल्या ‘त्या’ ऑफरबाबत मॅक्सवेलकडून खुलासा
- नितीन गडकरींनी बेळगावात मराठी उमेदवाराविरोधात प्रचार करण्याची बेईमानी करु नये – संजय राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

