बीड: जिल्ह्यातील माजलगाव येथील नवीन मोंढ्यात तेल पँकिंग करणाऱ्या युनिटला गुरुवारी पहाटे अचानक आग लागली. यात लाखो रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे यात खाद्यतेल व त्याचे पॅकिंग मटेरियल पूर्णतः जळून खाक झाले आहे.
नवीन मोंढ्यात संतोष अब्बड यांच्या मालकीच्या महावीर ट्रेडिंग कंपनीमध्ये गुरुवारी पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान अचानक आग लागली. आग विझवण्यासाठी प्रयतन केला असता तेलामुळे आग आणखी वाढू लागली. नवीन मोंढ्यातील सर्व व्यापारी तसेच तिथे उपस्थित नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला पण आग आटोक्यात येत नसल्याचे पाहून शेवटी अग्निशमन दलाला बोलवून आग विझवण्यात आली.
या ठिकाणी आग विझविण्यासाठी माजलगाव नगरपालिका ,सोळंके साखर कारखाना , गेवराई नगरपालिका आदी ठिकाणाहून अग्निशामन दल येऊन आग विझविण्याचा प्रयत्न करत होते. या आगीत मोठी हानी झाली असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या
- लॉकडाऊनची मुदत वाढविण्याची वेळ आणू नका, पालकमंत्री अमित देशमुख यांचे आवाहन
- जेव्हा खासदार मुंडे डॉक्टर म्हणून रुग्णालयात जातात!
- सामना जिंकल्यावर ट्रेन्ट बोल्ट म्हणाला ”बहुत अच्छा”
- शरद पवार यांना ब्रीच कँडीमधून मिळाला डिस्चार्ज; तब्येत उत्तम – नवाब मलिक
- ‘बंद काळात रिकाम्या थाळ्या वाजवून पोट भरणार नाही, भरलेल्या थाळ्याच द्याव्या लागतील’…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

