Share

राजस्थानविरुद्ध दिल्ली ; सॅमसन-पंत आमने-सामने

Published On: 

मुंबई : आज दिल्ली कॅपिटल्स व राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आयपीएल लढत रंगणार आहे. एकीकडे रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सचा संघ सलग दुसऱया विजयाला गवसणी घालण्यासाठी सर्वस्व पणाला लावेल तर दुसरीकडे या स्पर्धेतील पहिला विजय संपादन करण्यासाठी राजस्थान रॉयल्स प्रयत्नांची शिकस्त करील.

दरम्यान, सोमवारी झालेल्या आयपीएलच्या सामन्यात पंजाब किंग्सच्या संघाने राजस्थान रॉयल्स संघाचा ४ धावांनी पराभव करत आयपीएलमधील आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली. पहिल्या सामन्यातील पराभवातुन सावरण्याआधी राजस्थानच्या संघाला आणखी एक धक्का बसला. त्यांच्या संघाचा हुकमी एक्का मनाला गेलेला खेळाडू बेन स्टोक्स दुखापतीमुळे संघाबाहेर जावे लागले आहे.

त्याचवेळी दिल्ली कॅपिटल्स संघाला मोठा धक्का बसला. त्यांचा वेगवान गोलंदाज एनरीच नॉर्खियाला कोरोनाची लागण झाली आहे. पॅगिसो रबाडाही त्याच्यासोबत सात तास विमान प्रवासात होता, मात्र पॅगिसो रबाडाची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. दोन्ही संघातील महत्वाचे खेळाडू सध्या संघा बाहेर आहेत. त्यामुळे दोन्ही संघात सध्या चिंतेचे सावट पसरल्याचे दिसून येत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!