🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्रासह देशात कोरोना संसर्गाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. यामुळे राज्यातील आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत असून संसर्गाला आळा घालण्यासाठी राज्यात कडक निर्बंधांसह वीकेंड लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. तसेच, येत्या काळात काही दिवसांसाठी संपूर्ण लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे.
राज्यातील कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लॉकडाऊन लागू करण्याच्या तयारीत आहेत. याबाबत, त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांसह टास्क फोर्ससह प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आहे. दरम्यान, लॉकडाऊन लावण्याआधी गरजूंसाठी कम्युनिटी किचनचे नियोजन करा, अशी मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे.
‘लॉकडाऊन लावताना पुन्हा कम्युनिटी किचनचे नियोजन करावे. समाजातील अनेक घटक भुकमारीपासून बचावासाठी कम्युनिटी किचनचा आधार घेतात. कम्युनिटी किचनची भुमिका अतिशय महत्वाची आहे. माणूस हवालदिल झालाय त्याला आधाराची गरज आहे. त्यामुळे तसे निर्देश स्थानिक प्रशासनास देऊन प्रभावी अंमलबजावणी करावी.’ अशी मागणी करतानाच त्यांनी कम्युनिटी किचन कोणत्या घटकांसाठी उपलब्ध करून दिले जावे याची यादी देखील दिली आहे.
कम्युनिटी किचन खालील घटकांसाठी उपलब्ध करावे
तृतीयपंथी सेक्स वर्क नाका कामगार बेघर/ भिकारी बांधकाम मजूर फेरीवाले कचरा वेचक
एकल महिल जेष्ठ नागरिक घरेलु कामगार
बिडी कामगार विटभट्टी मजूर विकलांग दिव्यांग तमाशात लावणी कलावंत आराधी देवदासी जोगती व गोंधळी वाघ्या मुरळी व इतर गरजवंत (२/२)— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) April 11, 2021
कम्युनिटी किचन खालील घटकांसाठी उपलब्ध करावे –
- तृतीयपंथी सेक्स वर्कर
- नाका कामगार बेघर/ भिकारी
- बांधकाम मजूर
- फेरीवाले
- कचरा वेचक
- एकल महिल
- जेष्ठ नागरिक
- घरेलु कामगार
- बिडी कामगार
- विटभट्टी मजूर
- विकलांग-दिव्यांग
- लावणी कलावंत
- आराधी, देवदासी जोगती व गोंधळी तसेच वाघ्या मुरळी व इतर गरजवंत
महत्वाच्या बातम्या
- जयंत पाटलांचे शरद पवारांच्या पावलावर पाऊल,भगीरथ भालकेंसाठी घेतली भरपावसात सभा
- लॉकडाऊन कधी होणार ? टास्क फोर्सनंतर आता मुख्यमंत्र्यांची राज्याच्या मुख्य सचिवांसोबत बैठक
- महाराष्ट्रात कोरोना फोफावतोय; केंद्राने पत्र लिहून राज्य सरकारला फटकारलं
- रविंद्र जडेजाच्या चुकीमुळे सुरेश रैना आऊट ; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
- …तर सरकारी यंत्रणेवर मोक्का लावावा, निलेश राणेंचा घणाघात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

