🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्रासह देशात कोरोना संसर्गाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. यामुळे राज्यातील आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत असून संसर्गाला आळा घालण्यासाठी राज्यात कडक निर्बंधांसह वीकेंड लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. तसेच, येत्या काळात काही दिवसांसाठी संपूर्ण लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात रेमडेसीवीर इंजेक्शन साठी मोठी कसरत करावी लागत असल्याचं दिसून येत असतानाच गुजरातमध्ये मात्र या इंजेक्शनचं मोफत वाटप सुरू असल्याचं समोर आलं आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व मंत्री नवाब मलिक यांनी ट्विट करून भाजपला लक्ष्य केलं आहे.
दरम्यान, बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोफत इंजेक्शन उपलब्ध करून दिल्याचे वृत्त एका वाहिनीने दिले आहे. भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी हे वृत्त ट्विट करून नवाब मलिक यांनी केलेल्या टीकेलाच प्रतिप्रश्न केला आहे. ‘प्रत्येक कोरोनाबाधीत गरजूंना हे इन्जेक्शन मिळाले पाहिजे ही आमची भूमिका. एकीकडे लोक १/१ इंजेक्शन साठी चारी दिशाना फिरत असताना अचानक एका दिवसात बारामतीतच ४८० इंजेक्शन मोफत पवार साहेबांनी दिली कशी? हा साठा कसा आला? अस काही आम्ही विचारणार नाही,’ असा टोला केशव उपाध्ये यांनी लगावला आहे.
@nawabmalikncp जी प्रत्येक कोरोनाबाधीत गरजूंना हे इन्जेक्शन मिळाले पाहिजे ही आमची भूमिका. एकीकडे लोक १/१ इन्जेक्शन साठी चारी दिशाना फिरत असताना अचानक एका दिवसात बारामतीतच ४८० इन्जेक्शन मोफत पवार साहेबांनी दिली कशी? हा साठा कसा आला? अस काही आम्ही विचारणार नाही https://t.co/fKRiUwIyV7 pic.twitter.com/T3dbtZaDiP
— Keshav Upadhye (@keshavupadhye) April 11, 2021
रेमडेसीवीरचा तुटवडा कमी करण्यासाठी केंद्र सरकारच महत्वाचं पाऊल !
महाराष्ट्रातील स्थिती पाहता आता केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. रेमडेसीवीर इंजेक्शनची मागणी वाढली असून साठेबाजी करून चढ्या दराने हे इंजेक्शन विकण्याचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. राज्यात रुग्णांसाठी रेमडेसीवीर इंजेक्शन मिळवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना मोठ्या रांगेत उभे राहून अधिक दराने हे इंजेक्शन विकत घ्यावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने रेमडेसीवीरची निर्यात थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘आंबे खाऊन मुलगा होतो अशी विधाने करणाऱ्या व्यक्तींनी कोरोनाबाबत अफवा पसरवू नये’
- पुण्यात रेमडेसीवीरचा तुटवडा; पुण्याच्या महापौरांनी जाहीर केले ‘हे’ मदत क्रमांक
- तुटवडा भासत असलेल्या रेमडेसिवीरबाबत मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय
- रविंद्र जडेजाच्या चुकीमुळे सुरेश रैना आऊट ; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
- पॉझिटिव्ह रुग्ण बाहेर फिरताना आढळून आल्यास कडक कारवाई केली जाईल – जयंत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

