Share

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात – आ. सतीश चव्हाण

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्यायतीने १९ एप्रिल ते ३० जून या दम्बान एमवीबीएस. बीडीएस आदी वैद्यकीय शाखेच्या परीक्षा आवोजित करण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता याआधी या परीक्षा तीन वेळा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र सध्या राज्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत रेकॉर्ड ब्रेक वाढ होत आहे. त्यामुळे या परीक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी विद्यार्थी व पालकांमधून मोठ्या प्रमाणावर होत आहे. अशा आशयाचे निवेदन पत्र आमदार सतीश चव्हाण यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री आमित देशमुख यांना पाठवलं आहे.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने जाहीर केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे आफलाईन पध्दतीने या परीक्षा होणार असून कोविड आजाराविषयी आवश्यक ती सर्व खबरदारी घेऊन या परीक्षा होतील, असे विद्यापीठाच्यावतीने सांगण्यात आले असले तरी परीक्षा देणारे अनेक विद्यार्थी कोरोना बाधित असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच अनेक विद्यार्थी परीक्षेला बसता यावे यासाठी कोरोना चाचणी करत नसल्याचे निदर्शनास आल्याचे आ. सतीश चव्हाण यांनी या निवेदनात म्हणले आहे.

परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जावे लागते अशा मुळे संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोनाची पार्श्वभूमी पाहता तसेच दिवसेंदिवस वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी विद्यार्थी तसेच पालकांकडून होत आहे, या आधारावर आ. चव्हाण यांनी हे निवेदन पत्र वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांना पाठवले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!