🕒 1 min read
नवी दिल्ली- सर्व राजकीय पक्षांनी कोरोना नियमांचं काटेकोर पालन करावं, या नियमांचा वारंवार भंग करणाऱ्या नेत्याच्या रॅली आणि सार्वजनिक सभांवर बंदी घालण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा कडक इशारा निवडणूक आयोगानं दिला आहे.
निवडणूक प्रचारावेळी कोरोना नियमांचं पालन करण्यात हलगर्जीपणा होत असून विशेषतः मास्क न वापरणे आणि राजकीय सभांमध्ये व्यासपीठावरही सामाजिक अंतर पाळले जात नसल्याची गंभीर दखल निवडणूक आयोगानं घेतली आहे. आयोगानं सर्व राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरच्या राजकीय पक्षांना पत्र लिहित, राजकीय प्रचारावेळी कोरोना नियमांचं पालन होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
राजकीय पक्षांच्या आणि त्यांच्या उमेदवारांच्या अशा वर्तणुकीमुळं ते स्वत:चा आणि जनतेचाही जीव धोक्यात घालत आहेत, असं आयोगानं निदर्शनास आणून दिलंआहे. कोरोनाविरोधातल्या लढाईत राजकीय नेते आणि त्यांच्या उमेदवारांनी जनतेसमोर आदर्श निर्माण करायला हवा. स्वत: नियम पाळण्याबरोबरच या नेत्यांनी सभांना उपस्थित असलेल्या जनतेलाही कोरोना संसर्गासंदर्भात जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्याचा आग्रह करावा, अशी अपेक्षा आयोगानं व्यक्त केली आहे.
दरम्यान, देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. गेल्या 24 तासात एक लाखहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले असून सक्रिय रुग्णांची संख्या 10 लाखांच्यावर गेली आहे. गेल्या 24 तासात देशात 1 लाख 45 हजार 384 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 1 कोटी 32 लाख 5 हजार 926 वर पोहोचली आहे.
देशात सक्रिय रुग्णांची संख्या 10 लाख 46 हजार 631 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 1 कोटी 19 लाख 90 हजार 859 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशात आतापर्यंत 98 लाख 75 हजार 160 नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘सामान्य जनतेसाठी कायम कार्यरत असलेला एक समर्पित लोकप्रतिनिधी हरपला’
- आम्ही आतंकवादी नाही, आमचा हक्क मागायला आलोय – निलेश राणे
- कोरोना निर्बंध आणखी कडक करण्याची तयारी, सर्वपक्षीय बैठकीकडे अवघ्या राज्याचे लक्ष
- हर्षल पटेलची कमाल कामगिरी ; रोहित शर्माचा 12 वर्षाचा रेकॉर्ड मोडीत
- मॅक्सवेलचा तुफान षटकार पाहून कोहली हैराण : पहा व्हिडीओ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

