Share

कोरोना निर्बंध आणखी कडक करण्याची तयारी, सर्वपक्षीय बैठकीकडे अवघ्या राज्याचे लक्ष

Published On: 

मुंबई – राज्यात अंशतः आणि आठवड्याच्या अखेरीस कडक निर्बंध लावूनसुद्धा रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे आणखी कडक निर्बंध लावण्याच्या विचारात राज्य सरकार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, चंद्रकांत पाटील यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रण दिले आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध हाच पर्याय सरकारकडे आहे. मात्र त्याबाबत विरोधी पक्षांची भूमिका जाणून घेतली जाणार आहे.

दरम्यान,आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी तीन आठवड्यांच्या कडक निर्बंधांचे संकेत दिले आहेत. दुसरीकडे मुंबईच्या उपनगरी रेल्वेगाड्यांमधील गर्दी कमी करणंही आवश्यक असून त्यावर बंधन आणावी लागतील असंही वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक मोठ्या प्रमाणात वाढत असून या संकटाला सामोरे जायचे असेल, कोरोनाची साखळी तोडायची असेल तर कडक निर्बंध आवश्यकच आहेत. त्याच बरोबर आपल्याला आपल्या जीवन आणि कार्यशैलीत मोठे बदल करण्याची गरज आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!