Share

चिंताजनक! लातूर जिल्ह्यात दोन दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा

Published On: 

लातूर: गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत आहे. त्यामुळे रुग्णसंख्येत वाढ होत आहे, वाढत्या प्रादुर्भावामुळे का होईना नागरिकांचा लस घेण्याकडे कल वाढला आहे. दिवसाकाठी ६ जणांना लस दिली जात असून आता दोन दिवस पुरेल एवढ्याच लसीचा साठा आरोग्य विभागाकडे आहे. पुरवठा न झाल्यास जिल्ह्यातील काही केंद्र ही बंद करावी लागणार आहेत.

१७ जानेवारीपासून लातूर जिल्ह्यात लसीकरणाला सुरुवात झाली होती. याकरिता जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारीही करण्यात आली होती. मात्र, सुरवातीला नागरिकांनी लसीकरणाकडे पाठ फिरवली होती. मात्र, सध्या प्रादुर्भाव वाढत असताना लस घेण्याकडे नागरिकांचा कलही वाढला आहे. जिल्ह्यात १ लाख ८२ हजार एवढ्या लसीचा पुरवठा झाला होता. त्यानुसार जिल्ह्यातील १७० केंद्रावर लसीकरण मोहीम सुरू होती. बुधवारपर्यंत जिल्ह्यातील १ लाख ३०हजार नागरिकांना पहिल्या टप्प्यातील लस देण्यात आली आहे. दिवसाकाठी ६ जणांना लस देण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाने समोर ठेवले आहे. सध्या केवळ २० हजार लस शिल्लक आहेत.

दोन दिवसात लसीचा पुरवठा झाला नाही तर जिल्ह्यातील काही केंद्र हे बंद ठेवावी लागणार आहेत. लसीच्या पुरवठ्यापैकी ५०० लस या वाया गेल्या आहेत. ती निकामी ठरली होती. लसीच्या पुरवठ्याबाबत जिल्हा प्रशासनाने पत्रव्यवहार केला आहे. तर दोन दिवसात लसीचा पुरवठा होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या    

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!