Share

कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण हाच रामबाण उपाय : आमदार दानवे

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : राज्यासह औरंगाबाद जिल्हयात कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या झपाटयाने वाढत आहे. या संसर्गाला हद्दपार करण्याची ताकद कोरोना प्रतिबंधक लसीकरणातून शक्य आहे. लसीकरण हाच एकमेव रामबाण उपाय असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी केले.

मी जबाबदार या मोहिमेच्या माध्यमातून कोरोना संसर्गाला नियंत्रीत करण्यासाठी  जिल्हयात शिवसेना प्रवक्ते जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्या संयोजना खाली जनजागृती संवाद दौरा सुरू आहे. जिल्ह्यातील विविध गावांना भेटी देऊन covid-19 प्रतिबंधक लसीकरण करणे बाबत जनजागृती करण्यात येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मी जबाबदार ही मोहिम राज्यात सुरु केली आहे. त्याच धर्तीवर जिल्हयात या मोहिमेचे आयोजन करण्यात आले.

आज खुलताबाद तालुक्यातील वेरूळ पळसवाडी गल्लेबोरगाव निरगुडी धामणगाव खिर्डी या गावांना भेटी देऊन लसीकरण केलेल्या नागरिकांनी व इतरही नागरिकांनी कोरोनाला हद्दपार करण्यासाठी वारंवार हात धुणे, मास्क वापरणे, सामाजिक अंतर पाळणे या त्रिसुत्री अवलंब करण्याचे आवाहन आमदार अंबादास दानवे यांनी या वेळी केले. विनाकारण कोणिही घराच्या बाहेर पडू नये. आरोग्याला जर काही त्रास जाणवला तर नजीकच्या आरोग्य केंद्रामध्ये जावून तपासणी करुन घेण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या :    

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!