Share

महाराष्ट्रात महावसुलीचे सरकार आहे; उद्धव ठाकरे तुमची नैतिकता कोठे आहे? – रविशंकर प्रसाद

Published On: 

नवी दिल्ली : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या 100 कोटी रुपये वसुलीच्या कथित आरोपाप्रकरणी हायकोर्टात आज सुनावणी घेण्यात आली. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांची सीबीआयने 15 दिवसात प्राथमिक चौकशी करावी असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

यानंतर, नैतिकता लक्षात घेता गृहमंत्री अनिल देशमुख हे राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सोपवणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते व मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. भाजपने विविध प्रकरणांवरून अनिल देशमुखांच्या राजीनाम्यासाठी गेले काही महिने अक्षरशः रान उठवले होते. आता अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यावर विविध नेते आपली प्रतिक्रिया देत आहेत.

अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी महाराष्ट्र सरकारवर टीकास्त्र सोडले.ते म्हणाले,या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी आमची इच्छा आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे नाही. तर महावसुलीचे सरकार आहे, असे ते म्हणाले.

महाविकास आघाडीचे नाही. तर महावसुलीचे सरकार आहे. अनिल देशमुख यांनी आपल्या राजीनाम्यात नैतिक कारणास्तव राजीनामा देत असल्याचे लिहले आहे. जर अनिल देशमुख नैतिक कारणावरून राजीनामा देत असतील, तर उद्धव ठाकरे तुमची नैतिकता कोठे आहे?, असा सवाल रविशंकर प्रसाद यांनी केला.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!