Share

लॉकडाऊनचा धोका टळलेला नाही; मुख्यमंत्र्यांचे सूचक वक्तव्य

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून शहरी भागासह ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे. तर, केंद्र सरकारतर्फे देखील महाराष्ट्रात दुसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

गुरुवारी राज्यात ४३ हजार १८३ कोरोनाबाधित आढळले आहेत, तर २४९ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचसोबत राज्यात ३ लाख ६६ हजार ५३३ कोरोनाचे सक्रीय रुग्ण आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता जनतेशी सवांद साधत आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक होत असल्याने, लॉकडाऊनचा धोका टळलेला नाही असं मुख्यमंत्री म्हणाले. कोरोनाच्या उद्रेकामुळे महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे. असे सूचक वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केलेले आहे.

‘मी तुम्हाला घाबरवायला आलेलो नसून राज्यातील परिस्थिती समोर मांडण्यासाठी आलो आहे. मधल्या काळात आपण कोरोनाला आटोक्यात आणले होते. सर्वांनी एकत्रपणे या संकटाला तोंड दिले होते. मात्र, यानंतर पुन्हा सर्व काही सुरु झालं. समारंभ, सेलिब्रेशन सुरु झाले आणि पुन्हा एकदा कोरोनाची वाढ सुरु झाली. यामुळेच मी किमान एप्रिल अखेरपर्यंत संयम-धीर राखण्याचे आवाहन केले होते,’ असं भाष्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेवर आता कोणते निर्बंध लागू करणार आहेत हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!