🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे कोणत्या न कोणत्या कारणमुळे सतत चर्चेत असतात. महाराष्ट्रातील सध्याचे वातावरण बघता बरेच राजकारणी राज्यपालांची यांची भेट घेताना पाहायला मिळत आहे. त्यातच भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मुंबईतील राजभवनात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेत सर्वांना आश्चर्याचा धक्काच दिला आहे.
नुकत्याच पार पडलेल्या वन डे मालिकेमध्ये भारताने इंग्लंडला २-१ अशी धूळ चारली. त्याआधी २०-२० मालिका ३-२ आणि कसोटी मालिका ३-१ ने विजय मिळवला होता. कसोटी मालिकेतील विजयानंतर टीम इंडियानं जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली. भारतीय खेळाडूंनी या यशाचं श्रेय प्रशिक्षक रवी शास्त्री यांना दिले होत.
भारतीय संघातील खेळाडू मुंबईत दाखल झाले असून ते आयपीएलच्या तयारीला लागलेले आहेत. पण रवी शास्त्री यांनी मात्र आज महाराष्ट्राच्या राज्यपालांची भेट घेतल्याचे पाहायला मिळत आहे. पण या भेटीमध्ये नेमकं घडलं तरी काय, हे जाणून घ्यायची इच्छा सर्वांनाच आहे. पण ही सदिच्छा भेट असल्याचे सध्यातरी समजत आहे. पण या भेटीमध्ये नेमका काय संवाद झाला, हे अजून समजू शकलेले नाही.
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोनाचा धोका टाळण्यासाठी ‘या’ जिल्हयात तब्बल 15 दिवस असणार जमावबंदी
- आफ्रिकेच्या खेळाडूंचा पाकिस्तान दौरा अर्धवट सोडून भारतात येण्याचा निर्णय
- ‘आरएसएसचे लोक देशभक्त आहेत आणि इतर सर्व देशद्रोही आहेत’
- ‘खटल्याच्या निकालामुळे मी व्यक्तिश: निराश, मात्र मला निवांत झोप लागेल’
- बंडखोरांनी अवताडे-भालकेंची डोकेदुखी वाढवली, पंढरपूर पोटनिवडणुकीतील चुरस वाढली


