🕒 1 min read
कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021 च्या दुसऱ्या टप्प्यात भाजप आणि तृणमूल यांच्यात जोरदार घमासान सुरु आहे. निवडणुकीत चांगलाच रंग चढला आहे. भाजपा आणि टीएमसी यांच्यात मुख्य लढत आहे. भाजपने बंगाल जिंकण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली आहे तर दुसऱ्या बाजूला तृणमूल कॉंग्रेसचे नेते विजय आम्हीच मिळवू असं छातीठोकपणे सांगत आहेत.
या दरम्यान भाजप आणि तृणमूल दोन्ही पक्षांकडून हिंदू कार्डवर निवडणुका लढवण्यावर भर दिला जात आहे. या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राम येथे तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या सभेला संबोधित करत असताना चंडीपाठ या धार्मिक लेखातील मंत्रांचे पठण केले. यावेळी त्यांनी भाजपला ठणकावले , ‘मी दररोज घरातून बाहेर पडण्यापूर्वी चंडीपाठाचे उच्चारण करते,’ तसेच त्या पुढे म्हणाल्या की, मीसुद्धा एक हिंदू मुलगी आहे. त्यांनतर आता त्यांनी दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशी ममता बॅनर्जी यांनी आपलं गोत्र शांडिल्य असल्याचं सांगितलं. त्रिपुरेश्वरी मंदिरात मी माझं गोत्र मां, माटी, मानुष सांगितलं होतं. पण आज जेव्हा मला विचारण्यात आलं तेव्हा मी सांगितलं की माझं गोत्र शांडिल्य आहे. अस त्या म्हणाल्या
What should happen to people like me who aren’t Shandilya or Janeudhari, aren’t bhakts of certain gods, don’t recite Chalisa or any Path? Every party feels that it has to show its Hindu credentials to win. Unprincipled, insulting & unlikely to succeedhttps://t.co/FwbuEITnrb
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) March 31, 2021
यावरून AIMIM चे नेते आणि खासदार असदुद्दीने ओवेसी यांनी ममता बॅनर्जींवर निशाणा साधला आहे. ‘माझ्यासारख्या माणसांचे काय झाले पाहिजे जे शांडिल्य किंवा जनुधारी नाहीत, काही देवतांचे भक्त नाहीत, चालीसा किंवा कोणताही मार्ग पाळत नाहीत? प्रत्येक पक्षाला असे वाटते की विजयासाठी आपली हिंदू ओळख दाखवावी लागेल. सिद्धांत नसलेला, अपमान करणारा आणि यशस्वी होण्याची शक्यता नाही.’ अशी टीका त्यांनी ट्वीट करत केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ममता बॅनर्जींच्या ‘त्या’ वक्तव्यावर ओवेसी भडकले
- आफ्रिकेच्या खेळाडूंचा पाकिस्तान दौरा अर्धवट सोडून भारतात येण्याचा निर्णय
- ‘आरएसएसचे लोक देशभक्त आहेत आणि इतर सर्व देशद्रोही आहेत’
- ‘खटल्याच्या निकालामुळे मी व्यक्तिश: निराश, मात्र मला निवांत झोप लागेल’
- बंडखोरांनी अवताडे-भालकेंची डोकेदुखी वाढवली, पंढरपूर पोटनिवडणुकीतील चुरस वाढली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

