🕒 1 min read
गुवाहाटी: आसाम मध्ये दुसऱ्या टप्प्यातील ३९ जागांसाठी १ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे. राहुल गांधी हे आसाममध्ये पर्यटकांसारखे आले आहेत, असा टोला अमित शहा यांनी लगावला आहे.
शहा हे आसाम मधील चिरांग येथे आयोजित एका प्रचार सभेत बोलत होते. संबोधित करताना अमित शहा यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. ‘राहुल गांधी पर्यटक म्हणून आसाममध्ये आले आहेत. बदरुद्दीन अजमल हेच आसामचा चेहरा असल्याचं ते सांगत आहेत. तुम्हीच सांगा, अजमल आसामची ओळख आहेत की भूमेन हाजारिका, उपेंद्र नाथ आणि शंकर देव आहेत? ब्लॅक माऊंटेन अजमल हे आसामची ओळख असूच शकत नाही,’ असं शहा यांनी वक्तव्य केल आहे.
ते म्हणाले कि, घुसखोरांकडून काजीरंगा जंगलामध्ये प्राण्यांची शिकार केली जायची. आम्ही या घुसखोरांना हुसकावून लावलं आणि प्राण्यांची शिकार थांबवली आहे.
यावेळी त्यांनी बद्रुद्दीन अजमलच्या वक्त्यव्याचा समाचार घेतला आहे. सरकारची चावी माझ्या हातात आहे, माझ्या मनात येईल तसं सरकार चालवेल. ज्याला हवं त्याला मंत्री करेल असं अजमल म्हणाले होते. यावर शहा म्हणाले कि, सरकारची चावी तुमच्या हाती नाही, तर आसामच्या जनतेच्या हातात आहे. एक लक्षात ठेवा, आसामला आम्ही घुसखोरांचा अड्डा कदापि बनवू देणार नाही, या घुसखोरांना आम्ही हुसकावून लावल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.
शहा यांनी यावेळी आसामच्या जनतेला केलेले आश्वासन पूर्ण केल्याचं सांगितलं. ‘पाच वर्षांपूर्वी आसाममध्ये आलो तेव्हा तुम्हाला आश्वासन दिलं होतं. आम्ही आसामला दहशतवाद मुक्त करू असं आश्वासन दिलं होतं. आम्ही हे आश्वासन पूर्ण केलं आहे. आम्ही आंदोलन मुक्त आसामही केला आहे. आता तुम्ही आम्हाला सत्ता द्या, आम्ही आसामचा विकास करून दाखवू, अशी ते यावेळी म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ममता बॅनर्जींच्या ‘त्या’ वक्तव्यावर ओवेसी भडकले
- आफ्रिकेच्या खेळाडूंचा पाकिस्तान दौरा अर्धवट सोडून भारतात येण्याचा निर्णय
- ‘आरएसएसचे लोक देशभक्त आहेत आणि इतर सर्व देशद्रोही आहेत’
- ‘खटल्याच्या निकालामुळे मी व्यक्तिश: निराश, मात्र मला निवांत झोप लागेल’
- बंडखोरांनी अवताडे-भालकेंची डोकेदुखी वाढवली, पंढरपूर पोटनिवडणुकीतील चुरस वाढली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

