Share

ममता बॅनर्जींच्या ‘त्या’ वक्तव्यावर ओवेसी भडकले

Published On: 

🕒 1 min read

कोलकत्ता : पश्चिम बंगालच्या निवडणुकीत चांगलाच रंग चढला आहे. भाजपा आणि टीएमसी यांच्यात मुख्य लढत आहे. भाजपने बंगाल जिंकण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली आहे तर दुसऱ्या बाजूला तृणमूल कॉंग्रेसचे नेते विजय आम्हीच मिळवू असं छातीठोकपणे सांगत आहेत.

तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या स्वत: नंदीग्राम मतदार संघातून निवडणूक लढणार आहेत. प्रचारच्या दुसऱ्या टप्प्यात नंदीग्राम या स्वत:च्या विधानसभा मतदारसंघात बोलताना ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा हिंदू कार्ड बाहेर काढलं. ‘मी मंदिरात गेले होते. तेव्हा पुजाऱ्यांनी विचारलं की तुमचं गोत्र काय? मला आठवलं की त्रिपुरेश्वरी मंदिरात मी माझं गोत्र मां, माटी, मानुष सांगितलं होतं. पण आज जेव्हा मला विचारण्यात आलं तेव्हा मी सांगितलं की माझं गोत्र शांडिल्य आहे. पण मी मानते की माझं गोत्र मां, माटी, मानुष आहे’.

दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशी ममता बॅनर्जी यांनी आपलं गोत्र शांडिल्य असल्याचं सांगितलं. त्यावर AIMIM चे नेते आणि खासदार असदुद्दीने ओवेसी यांनी ममता बॅनर्जींवर जोरदार हल्ला चढवला आहे. मी शांडिल्यही नाही आणि जानवंही घालत नाही, मग मी काय करु? असा सवाल ओवेसी यांनी ममता बॅनर्जींना विचारला आहे.

‘अशा लोकांनी काय करावं, जे शांडिल्य नाहीत किंवा जानवंही घालत नाहीत. जो कुण्या ठराविक देवाचा भक्त नाही. ना चालीसाचं पठण करतो. प्रत्येक पत्र जिंकण्यासाठी हिंदू कार्ड खेळतो आहे. हे अनैतिक, अपमानकारक आहे. तसंच या प्रयत्न यशस्वी होणार नाही’, असं ट्वीट करत ओवेसी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!