मुंबई: कोरोना साथीच्या कालावधीत देशात लॉकडाउन लागू करण्यात आल्याने लोकांकडून बाहेर जाणे टाळण्यासाठी ऑनलाइन शॉपिंग, ऑनलाईन ट्रांजेक्शन, त्याचबरोबर अनेकदा ग्राहक वेगवेगळ्या ऑफिसला देखील बळी पडत असतात. याचा फायदा अनेक सायबर गुन्हेगारांकडूनही घेतला जात असल्याच्या अनेक घटना आपल्या समोर आल्या आहेत. त्यामुळे सायबर सुरक्षेबाबत अधिक जागरूक होणं आवश्यक आहे.
दरम्यान एचडीएफसीच्या बँकेच्या इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग व पेमेंट युटिलिटीसंदर्भात व्यत्यय आल्याने रिझर्व बँकेने एचडीएफसीच्या व्यवहारांवर काही निर्बंध आणले होते. त्यानंतर देखील एचडीएफसी बँकेच्या डिजीटल सेवेमध्ये नेहमीच विस्कळित व्यवहार असल्याने भारतीय रिझर्व्ह बँकेने एचडीएफसी बँकेच्या कार्यप्रणालीचे लेखापरीक्षण करण्याचा निर्णय घेतला होता.
त्यांनतर आता पुन्हा एचडीएफसी बँकेच्या काही ग्राहकांना नेटबँकिंग आणि मोबाईल अॅपची सेवा घेताना अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे. या संदर्भात ग्राहकांनी समाज माध्यमामध्ये तक्रार केल्या आहेत. यावर बँकेने देखील ट्वीट करत काही ग्राहकांना नेटबँकिंग आणि मोबाईल बँकिंग वापरताना समस्या जाणवत आहे. त्याकडे आम्ही प्राधान्याने पाहत आहोत. गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. काही वेळानंतर पुन्हा प्रयत्न करून पाहा. धन्यवाद, असे म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आज बाळासाहेब असते तर, पहिले आमंत्रण देवेंद्रजींना दिले असते – नितेश राणे
- शिवसेनेच्या नव्या प्रवक्त्यांची यादी जाहीर; नाराज भास्कर जाधवांची लागली वर्णी
- ‘परिस्थिती गंभीर असताना जल्लोष करुन नाचताना शरम वाटायला पाहिजे’
- ‘खटल्याच्या निकालामुळे मी व्यक्तिश: निराश, मात्र मला निवांत झोप लागेल’
- ‘बांगलादेश स्वातंत्र्यसंग्रामातील सैनिक म्हणून मोदींना गौरवाचा ताम्रपट मिळायला हवा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

