🕒 1 min read
मुंबई : येत्या ९ एप्रिल पासुन आयपीएलचे नवे सत्र सुरु होत आहे. यंदाच्या सत्रातील पहिला सामना हा रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स आणि विराट कोहलीच्या आरसीबीमध्ये ९ एप्रिल रोजी होणार आहे. यंदाच्या आयपीएल सत्रासाठी अनेक खेळाडू हे आपआपाल्या संघाच्या सराव शिबीरात दाखल झाले आहे.
क्रिकेट विश्वात लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या आयपीएलसाठी दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूंनी चक्क पाकिस्तान दौरा अर्धवट सोडून भारतात येण्याचा निर्णय घेतला आहे. क्विंटन डिकॉक, डेव्हिड मिलर, खगिसो रबाडा, एनरिच नॉर्खिया व लुंगी एन्गिडी हे दक्षिण आफ्रिकन खेळाडू पाकिस्तान दौरा सोडून आयपीएलमध्ये खेळणार आहेत. ‘आयपीएल’ फ्रेंचाईजींनीही या क्रिकेटपटूंसाठी चार्टर्ड प्लेन पाठविण्याची तयारी केली आहे.
दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेटपटू ‘आयपीएल’ फ्रेंचाईजींनी पाठविलेल्या चार्टर्ड प्लेनने आल्यास त्यांना सात दिवस क्वारंटाईन राहावे लागणार नाही. मात्र, हे खेळाडू दुसऱया विमानाने आले, तर मग त्यांना नियमानुसार क्वारंटाईन कालावधी पूर्ण करावा लागेल.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘भेद-नीतीचा प्रयोग करून काय साध्य होणार ?’
- ‘…तर सचिन तेंडुलकर, लक्ष्मण आणि गांगुली कधीच खेळू शकले नसते’
- ‘चंद्रकांत पाटील वगैरे नेते तर आणखी एका पहाटेच्या शपथविधीच्या स्वप्नरंजनात दंग झाले’
- सॉफ्ट सिग्नल नंतर बीसीसीआयने आणखी एक मोठा निर्णय
- ‘मैदानावरचा माझा आवडता शत्रू…लवकर बरा हो…’ ; शोएब अख्तरने केली सचिनसाठी प्रार्थना


